Beed woman jumps into well with son over mobile dispute
बीड महाराष्ट्र

बीड हादरलं! नवीन मोबाईल न दिल्याने महिलेची चिमुकल्यासह विहिरीत उडी…

बीड : बीड तालुक्यातील लिंबारुई परिसरात ३१ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पतीकडून नवीन मोबाईल फोन न मिळाल्याच्या रागातून २४ वर्षीय महिलेने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलासह शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मृत महिलेचे नाव प्राजक्ता उर्फ राधा रामेश्वर दराडे (वय २४) असून, तिच्या मुलाचे नाव वेदांत (वय ३ वर्षे ५ महिने) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ता गेल्या काही दिवसांपासून पती रामेश्वर बाबासाहेब दराडे यांच्याकडे नवीन मोबाईल फोनची मागणी करत होती. आर्थिक अडचणींमुळे पती मोबाईल देऊ न शकल्याने दोघांमध्ये वाद झाला.

या वादानंतर रागाच्या भरात प्राजक्ताने टोकाचा निर्णय घेत शेतातील विहिरीत मुलासह उडी मारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेनंतर सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाची नोंद अपघाती मृत्यू (ADR) म्हणून केली होती. मात्र, सखोल चौकशी व पतीच्या पुरवणी जबाबानंतर या घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी स्पष्ट झाली.

यानंतर ३१ जानेवारी २०२६ रोजी या प्रकरणी सविस्तर एफआयआर दाखल करण्यात आली. कायदेशीर प्रक्रियेनुसार, मृत आई प्राजक्ता हिच्याविरुद्ध निष्पाप मुलगा वेदांत याला बुडवून मारल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज करत आहेत. साध्या मोबाईल फोनच्या कारणावरून दोन जीव गेले, यामुळे संपूर्ण लिंबारुई परिसर शोकसागरात बुडाला आहे.

दरम्यान, समाजशास्त्रज्ञ व तज्ज्ञांचे मत आहे की वाढता मानसिक ताण, संवादाचा अभाव आणि क्षुल्लक कारणांवरून होणारा अनियंत्रित राग अशा दुर्दैवी घटनांना कारणीभूत ठरत आहे. अशा प्रसंगी समुपदेशन व कौटुंबिक संवाद अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ते सांगतात.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत