सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या गुन्ह्यावरुन ठाकरे सरकारला फटकारले आहे. अशा टीकेकडे दुर्लक्ष करायला शिका, असा सल्ला उच्च न्यायालयाने दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपनं ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात काही अक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली होती. या प्रकरणी सुनैना होले या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी सुनैना या महिलेनं न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं आहे.
सोशल मीडियावरील किती टीकाकारांविरुद्ध खटले दाखल करणार? दुर्लक्ष करायला शिका.. अशी समज अखेर मुंबई उच्च न्यायालयाला सुडबुद्धी ठाकरे सरकारला द्यावी लागली. हे राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण, असे ट्विट करत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
राज्य सरकार सोशल मीडियावरील किती टीकाकारांविरुद्ध खटले दाखल करणार ? दुर्लक्ष करायला शिका… अशी समज अखेर मुंबई उच्च न्यायालयाला सूडबुद्धी ठाकरे सरकारला द्यावी लागली. हे राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण… pic.twitter.com/hxUvnTCx9L
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 2, 2020