पुणे : ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते नाटय़, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता होते. त्याशिवाय ते चित्रकार आणि वास्तुविशारद होते. तसेच उत्तम सुगम संगीत गायकही होते.
श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. बी.एस्सी साठी ते पुण्याच्या स.प.कॉलेजात आले. पुढे मुंबईला जाऊन त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाट्य अभिनयाकडे वळले. श्रीकांत मोघे यांनी आतापर्यंत 60 हून अधिक नाटकांत आणि 50 हून अधिक चित्रपटांत कामे केले. पुलं यांच्यासोबत ते जवळपास 50 वर्षे ते कार्यरत होते.
अतिशय कमी वयापासूनच कलाविश्वाळी नातं जोडलेल्या श्रीकांत मोघे यांच्या जाण्यानं अनेकांनीच हळहळ व्यक्त केली आहे. चाहते आणि कलाकार मंडळी या नटश्रेष्ठाला आपल्या परिनं श्रद्धांजली वाहत आहेत.




