how you to keep good health in winter season
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

हिवाळ्यात थंडीपासून रक्षण करताना ‘या’ चुका कटाक्षाने टाळा

पुणे : हिवाळ्यात सर्दी, फ्लू आणि संसर्ग पसरण्याचा धोका लक्षणीय वाढतो. या ऋतूत थंडीपासून वाचण्यासाठी लोक उबदार कपडे, गरम पाणी, चहा-कॉफी यासारख्या गोष्टींचा अवलंब करतात. पण तुम्हाला माहित आहे का की सर्दीपासून आराम मिळवण्याच्या काही युक्त्या तुमच्यासाठी समस्या देखील निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ, जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्यानेही शरीराला हानी पोहोचते. हिवाळ्यात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेऊया.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जास्त कपडे घालणे टाळा :
हिवाळ्यात स्वतःला उबदार ठेवणे चांगली गोष्ट आहे, परंतु जास्त कपडे घालणे टाळायला हवे. कारण असे केल्याने तुमचे शरीर अतिउष्णतेचे शिकार होऊ शकते. जेव्हा आपल्याला सर्दी होते, तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती पांढऱ्या रक्त पेशी (WBC) तयार करते, ज्या आपल्याला संक्रमण आणि रोगांपासून वाचवतात. परंतु, जेव्हा शरीर जास्त गरम होते तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती आपले कार्य करू शकत नाही.

विचार करून खायला हवे :
थंडीच्या मोसमात आपली भूक वाढते आणि काहीजण तब्येतीची पर्वा न करता काहीही खाऊ लागतात. खरं तर, थंडीशी लढताना आपल्या शरीरातील जास्त कॅलरीज खर्च होतात, ज्याची भरपाई आपण अतिरिक्त-कॅलरीयुक्त अन्नाने करू लागतो. अशा परिस्थितीत भूक लागल्यावर फक्त फायबरयुक्त भाज्या किंवा फळे खायला हवीत.

जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा :
तज्ज्ञांच्या मते, थंडीत जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणे आरोग्यासाठी चांगले नाही. याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. गरम पाणी त्वचेच्या केराटिन नावाच्या त्वचेच्या पेशींना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे त्वचेला खाज, कोरडेपणा आणि पुरळ उठण्याची समस्या वाढते.

चहा-कॉफीचे जास्त सेवन करू नका :
थंडीच्या मोसमात चहा-कॉफीने शरीर उबदार ठेवण्याचा विचार चांगला आहे. पण कदाचित तुम्ही विसरत असाल की जास्त कॅफीन शरीरासाठी हानिकारक आहे. एका दिवसात 2 किंवा 3 कपपेक्षा जास्त कॉफी पिऊ नये.

भरपूर पाणी प्या :
हिवाळ्यात लोकांना तहान कमी लागते. पण याचा अर्थ असा नाही की थंडीत शरीराला पाण्याची गरज नसते. लघवी, पचन आणि घाम याद्वारे पाणी शरीरातून बाहेर पडते. अशा स्थितीत पाणी न पिल्याने शरीरात पाणी कमी होऊ लागते. यामुळे किडनी आणि पचनाची समस्या वाढू शकते.

झोपण्यापूर्वी काय करावे?
रात्री झोपण्यापूर्वी हात आणि पाय हातमोजे आणि सॉक्सने झाकून ठेवणे आरोग्यासाठी चांगले असते. झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ही पद्धत खूप फायदेशीर मानली जाते. या ऋतूत दिवस लहान होतात आणि रात्र मोठी होते. अशावेळी शरीरात मेटॅलोनिन हार्मोनचे (झोपेचा संप्रेरक) उत्पादन देखील वाढते. यामुळे डुलक्या येऊ लागतात, आळस वाढतो, सुस्ती येते, त्यामुळे झोपेच्या वेळातच पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा.

स्वतःच औषधोपचार करणे घातक :
या ऋतूमध्ये लोकांना खोकला, सर्दी किंवा तापाचा त्रास होतो. अशा परिस्थितीत, डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःच औषधोपचार करणे घातक ठरू शकते. ही काही गंभीर आजाराची लक्षणे देखील असू शकतात. त्यामुळे, कोणतेही औषध किंवा प्रिस्क्रिप्शन वापरण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

व्यायाम :
थंडीच्या मोसमात बहुतेक लोक थंडीपासून वाचण्यासाठी घराबाहेर पडणे बंद करतात. मात्र, असे केल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. घरात आकुंचित झाल्यामुळे तुमची शारीरिक हालचाल बिघडेल. लठ्ठपणा वाढेल आणि तुम्हाला सूर्यकिरणांपासून व्हिटॅमिन डी मिळू शकणार नाही. तसेच थंडीत कमी तापमानामुळे लोक अंथरुणात राहतात. शून्य शारीरिक हालचालींमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे सायकल चालवणे, चालणे किंवा कोणताही व्यायाम सुरू करा.

World Stroke Day : काळजी घ्या! दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयी वाढवू शकतात स्ट्रोकचा धोका

थंडीच्या दिवसांत करा ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश, शरीर उबदार राहून मिळतील अनेक पोषक तत्त्वे

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत