actor Zara Phythian sentenced to 8 years in jail for sexually abusing minor girl
ग्लोबल मनोरंजन

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अभिनेत्री झारा फिथियनला 8 वर्षांची शिक्षा

हाॅलिवूडमधील डाॅक्टर स्ट्रेंज फेम अभिनेत्री जारा फिथ‍ियनला कोर्टानं बाल लैंगिक अत्याचारासाठी ८ वर्षांची कैद सुनावली आहे. नाॅटिंघम क्राऊन कोर्टात सोमवारी याबाबत सुनावणी झाली. जारा फिथियन १३ ते १५ वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करत होती. या घटना २००५ आणि २००८ च्या मध्ये घडल्या होत्या.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोर्टानं जारा फिथियनचा नवरा व्हिक्टर मार्कालाही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात तोही सामील होता. ५९ वर्षाच्या व्हिक्टरला पीडित मुलीबरोबर अत्याचार आणि दुसऱ्या एका मुलीशी अश्लील व्यवहार केल्याबद्दल १४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दोघं पती पत्नी या शिक्षेनंतर लैंगिक गुन्हेगारांच्या रजिस्टरमध्ये सही करतील. त्यानंतर त्यांना कधीच मुलांबरोबर काम करायला मिळणार नाही. सोमवारी दोघांनाही एकत्र कोर्टात आणण्यात आलं. रिपोर्ट्सनुसार जाराचा नवरा पब्लिक गॅलरीत लोकांना पाहून रडू लागला. तर अभिनेत्री अस्वस्थ दिसत होती. दरम्यान तिनं पब्लिक गॅलरीत कोणाकडे तरी पाहून हातही दाखवला.

पोलिसांच्या तपासणीत पीडित मुलीने सांगितलं की, त्यांनी माझ्याशी भेदभाव केला आणि माझी शिकार केली. व्हिक्टर मार्क याने अतिशय वाईट पद्धतीने लैंगिक अत्याचार केले. कोर्टात पीडित मुलगी म्हणाली, तू माझी निरासगता संपवली. मला धमकावलं. पण आता मी कोणाच्या हातातली कठपुतळी होणार नाही.

शिक्षा सुनावताना न्यायमूर्ती मार्क वाटसन म्हणाले, पीडित बालिकेवरचा अत्याचार हा प्लॅनिंग करून केला आहे. कोर्टानं पती मार्कला सांगितलं, या लैंगिक शोषणामागे मुख्य तूच आहेस. जारा आणि तिच्या पतीनं त्यांच्यावर असलेले १४ लैंगिक अत्याचाराचे आरोप नाकारले होते. पण कोर्टाने ते फेटाळून लावलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत