Salman Khan starrer 'Veer' producer Vijay Gilani passes away
मनोरंजन

सलमान खान स्टारर ‘वीर’ चित्रपटाचे निर्माते विजय गिलानी यांचे निधन

मुंबई : यावर्षी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. आता बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते विजय गिलानी यांच्या निधनाची बातमी आली आहे. विजय गिलानी हे बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांनी सलमान खान स्टारर ‘वीर’ आणि ‘सूर्यवंशी’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. वृत्तानुसार, विजय गिलानी यांना ब्लड कॅन्सर झाला होता, त्यानंतर ते लंडनला गेले होते. त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आणि बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वृत्तानुसार, बॉलिवूड निर्माता विजय गिलानी दीर्घकाळापासून ब्लड कॅन्सरशी झुंज देत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वीच त्यांना त्यांच्या आजाराची माहिती मिळाली होती. वेदना वाढत गेल्याने ते तीन महिन्यांपूर्वी कुटुंबासह लंडनला गेले होते, जिथे त्यांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट होणार होते. परंतु, असंख्य प्रयत्न करूनही ते कॅन्सरशी जास्त काळ लढू शकले नाहीत. कॅन्सरने त्रस्त असलेले विजय गिलानी यांचे २९ डिसेंबर रोजी निधन झाले.

विजय गिलानी यांच्या निधनाची पुष्टी करताना बॉलीवूडचे निर्माते अनिल शर्मा म्हणाले की, ‘विजय यांच्या निधनाच्या वृत्ताने मला खूप दु:ख झाले आहे. तो खूप चांगला होता. माझे त्याच्याशी नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. अनिल शर्मा यांनी विजय गिलानीसोबत वीर चित्रपटात दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय गलानी यांचा मुलगा प्रतीक गिलानी लंडनला रवाना झाला आहे. काही दिवसांपूर्वी तो लंडनहून परत आला होता, मात्र वडिलांच्या निधनाची बातमी समजताच तो पुन्हा लंडनला रवाना झाला.

विजय गिलानी दीर्घकाळ बॉलिवूडमध्ये काम करत होते. आपल्या कारकिर्दीत विजय गिलानी यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. याशिवाय त्यांनी अक्षय कुमार, बॉबी देओल, करीना कपूर, गोविंदा, विद्युत जामवाल आणि मनीषा कोईराला यांसारख्या लोकप्रिय स्टार्ससोबत काम केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत