मुंबई : कमाल राशिद खान सुरुवातीपासूनच सांगत आहे की सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाची खराब समीक्षा केल्यामुळे सलमानने त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. पण, सलमान खानच्या वकिलांनी गुरुवारी निवेदन जारी करून संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केली आहे आणि सांगितले की ‘राधे’ चित्रपटाच्या समीक्षेचा या खटल्याशी काहीही संबंध नाही.
सलमान खानचे वैयक्तिक वकील आणि सलमान खानच्या कंपन्यांचे वकील डीएसके लीगल यांनी गुरुवारी याबाबतचे सर्व गैरसमज दूर केले. डीएसके लीगलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या खटल्याचे कारण ‘राधे’ चित्रपटाची समीक्षा असल्याचं सांगण्यात येत आहे, जे योग्य नाही. निवेदनानुसार, “हा खटला प्रतिवादीच्या सतत अपमानजनक आरोपांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे, ज्यामध्ये सतत सलमान खानवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत आणि त्याचा ब्रँड बीइंग ह्युमनचा संबंध फसवणूक, बेईमानी आणि पैशाच्या घोटाळ्याबरोबर जोडला गेला आहे.
सलमानने केआरके विरोधात दाखल केला मानहानीचा खटला, केआरकेने अगोदर खिल्ली उडवली, पण नंतर…
डीएसके लीगलच्या निवेदनात असेही म्हटले आहे की कमाल राशिद खानने सलमान खान आणि सलमान खान फिल्म्स यांनाही दरोडेखोर देखील म्हटले आहे. या निवेदनानुसार, “प्रतिवादी अनेक महिन्यांपासून सलमान खानविषयी खोटा प्रचार करत आहेत. हा एक प्रकारे सलमान खानचे स्वतःकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. गुरुवारी कमाल राशिद खानच्या वकिलांनी कोर्टात असे निवेदन दिले आहे की, पुढील तारखेपर्यंत त्यांचे क्लायंट सलमान खानविषयी सोशल मीडियावर अशी कोणतीही कॉमेंट देणार नाहीत, ज्यामुळे त्यांची बदनामी होईल.

शस्त्रक्रिया करून पुरुष बनली ही प्रसिद्ध अभिनेत्री , ६ पॅक ऍब्सचे फोटो केले शेअर
‘स्कूल ऑफ रॉक’ फेम अभिनेता केव्हिन क्लार्कचे अपघातात निधन, हॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा




