मनोरंजन

सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाने मुंबईत दोन फ्लॅट खरेदी केले

सुशांतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीने मुंबईत दोन फ्लॅट खरेदी केले होते. हे दोन्ही फ्लॅट खारमध्ये घेतले आहेत. याप्रकरणी ईडी चौकशी करणार असून ते लवकरच याविषयी रियाची चौकशी करणार आहेत,असं ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुंबईतील खार या परिसरात अनेक उच्चभ्रु नागरिक राहत असून येथील जागेच्या आणि घराच्या किंमती प्रचंड आहेत. अशा ठिकाणी रियाने दोन फ्लॅट घेणं ही साऱ्यांसाठीच आश्चर्याची बाब आहे. रियाने करिअरमध्ये फारसं यश मिळवलं नसतांना तिच्याकडे इतके पैसे आले कुठून हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्षाला १५ ते १७ लाख रुपयांची कमाई करणारी रिया १-२ वर्षांमध्ये कोटयवधी किंमतींचे फ्लॅट कसे काय घेऊ शकते हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता ईडी रियाची चौकशी करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

गेल्या चार वर्षांमध्ये सुशांतच्या खात्यातून जवळपास ५० कोटी रुपयांची रक्कम काढण्यात आली होती. परंतु, या चार वर्षांच्या कालावधीत सुशांतने एकही घर किंवा अन्य कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली नव्हती. तर दुसरीकडे याच काळात रियाने बराचसा पैसा प्रॉपर्टी खरेदी करण्यात वापरला.

दरम्यान, नवी मुंबईमध्ये रियाच्या नावावर एक फ्लॅट आहे. तर मुंबईतील खार येथे असलेला फ्लॅट रियाच्या वडिलांच्या नाववर रजिस्टर आहे. तसंच नवी मुंबईत सुशांतच्या दोन कंपन्या असून त्यादेखील रियाच्या वडिलांच्या नावे असल्याचं सांगण्यात येत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत