babil khan remembers father irrfan khan on his first death anniversary wrote no one can take your place

इरफान खानच्या निधनाला एक वर्ष पूर्ण, मुलगा बाबिलने थ्रोबॅक फोटो शेअर करत घातली भावनिक साद

मनोरंजन

नवी दिल्ली : दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता इरफान खान यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा बाबिलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे, तो म्हणाला कि, “त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. बाबिलने आपल्या इंस्टाग्रामवर इरफान खान यांचा एक थ्रोबॅक फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये इरफान आपला टेबल दुरुस्त करताना दिसत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बाबिलने हा फोटो शेअर करत आपल्या वडिलांची आठवण सांगणारी भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिले कि, “केमो तुम्हाला आतून जाळत होता, त्यामुळे तुम्ही साध्या-सोप्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचात. जसं की आपली जर्नल्स लिहिण्यासाठी तुम्ही स्वतःचे टेबल स्वतःच बनवलं. यामध्ये एक प्रकारची शुद्धता (Purity) आहे, जी मला अद्याप सापडली नाही. माझ्या बाबांनी तयार केलेला हा खूप अगोदरचा वारसा आहे, जो पूर्णविराम आहे. कोणीही कधीही त्यांची जागा घेऊ शकत नाही. तो एक चांगला मित्र, पार्टनर, वडील, भाऊ होता. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि प्रत्येक क्षणी तुझी आठवण येते. माझी इच्छा होती की मी तुझ्याबरोबर असावं आणि आपण हातात हात घेऊन एकत्र फिरू.” सोशल मीडियावर बाबिलची पोस्ट चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत