Pankaja Munde infected with corona

भाजप नेत्या पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण

कोरोना बीड महाराष्ट्र राजकारण

बीड : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली. त्या म्हणाल्या कि, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्या घरीच उपचार घेत आहेत. त्यांनी अनेक कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. तिथेच त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असावा असा अंदाज आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पंकजा मुंडे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या की, ”माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सावधगिरी बाळगून आधीपासूनच विलिगिकरणात आहे. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनाला बळी पडलेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. व काळजी घ्या.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत