मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेनला दोन दिवसांपूर्वी हार्ट अटॅक आला होता. सुष्मितानं स्वत: पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. तिच्यावर एंजियोप्लास्टी सर्जरी करण्यात आल्याचं तिने पोस्टमध्ये सांगितलं आहे. सुष्मिताने तिचे वडील सुबीर सेन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत तिनं गेल्या काही दिवसांत काय घडलं, याबद्दल सांगितलं आहे.
सुष्मिताची अचानक तब्येत बिघडली होती आणि तिला हृदयविकाराचा झटका आला होता. एंजियोप्लास्टी झाल्यानंतर आता तिची तब्येत बरी असल्याचंही तिनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सुष्मितानं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, आपल्या हृदयाची काळजी घ्या. तुमच्या चांगल्या -वाईट काळात तुमचं हृदय तुमची साथ देणार आहे. मला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर एंजियोप्लास्टीही करण्यात आली. आता हृदय सुरक्षित आहे. एक महत्त्वाचं म्हणजे कार्डियोलॉजिस्टनं हे कन्फर्म केलंय की, माझं हृदय खरंच खूप मोठं आहे.
View this post on Instagram
४७ वर्षीय सुष्मिता इंडस्ट्रीतल्या फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे तिला हार्ट अटॅक आल्याची बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. चाहत्यांनी सुष्मिताच्या पोस्टवर कमेंट करत लवकर बरी हो… काळजी घे असं म्हटलं आहे.