पुणे : पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली.
- कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी. भाजपच्या रासने यांनी पराभव केला मान्य.
- चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांना चौदाव्या फेरीअखेर 49079 मते. नाना काटे यांना 40766, तर राहुल कलाटे यांना 15017 मते.