Actor Siddharth Shukla Death Due To Heart Attack

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, मनोरंजन विश्वामध्ये खळबळ

मनोरंजन

मुंबई : अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संपूर्ण मनोरंजन विश्वामध्ये या बातमीने खळबळ उडाली आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका त्याच्या मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. तो टीव्ही शो बिग बॉस -13 चा विजेता होता. ‘बालिका वधू’ या मालिकेतून तो लोकप्रिय झाला. सिद्धार्थचा मृतदेह मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे. येथे त्याचे शवविच्छेदन केले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधे घेतली होती. परंतु त्याने कोणते औषध घेतले होते हे उघड झाले नाही. त्याने बुधवारी रात्रीच तब्येत बिघडल्याची तक्रार केली होती. त्यानंतर, औषध घेऊन तो लवकरच झोपायला गेला. सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. त्याला रुग्णालयात आणण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचे झोपेतच हार्ट अटॅकने निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत