केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) बोर्डाने शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी केलेल्या सूचना सीबीएसई बोर्डाने विचारात घेणार असून आगामी परीक्षांचे आयोजन करताना त्यानुसार आवश्यक तयारी करण्यात येणार आहे. सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या परीक्षांच्या तारखेच्या संदर्भात अधिक माहिती शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट cbse.nic.in वर मिळेल.
४ मे २०२१ पासून बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार असून १० जूनपर्यंत परीक्षा संपवण्याचा प्रयत्न आहे. तर प्रॅक्टिकल्स हे १ मार्चपासून सुरू होणार आहेत. तसेच १५ जुलै पर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी म्हटलं आहे.
Announcing the date of commencement for #CBSE board exams 2021. @SanjayDhotreMP @EduMinOfIndia @cbse @mygovindia @MIB_India @PIB_India @DDNewslive https://t.co/PHiz3EwFvz
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) December 31, 2020
बोर्डाकडून हॉल तिकिट विद्यार्थ्यांना २०२१ मध्येच मिळणार असून त्याची अधिकृत तारीख आणि इतर माहिती बोर्डाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल.