The body of a minor girl was found naked in the field
क्राईम देश

शेतात विवस्त्र अवस्थेत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, 200 मीटरपर्यंत फरपटत नेल्याच्या खुणा

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील औरैया येथे 17 वर्षीय मुलीचा मृतदेह शेतात विवस्त्र अवस्थेत आढळून आला. मुलीच्या घरापासून 500 मीटर अंतरावर मृतदेह आढळून आला. सकाळी आठ वाजता ती शेतात गेली होती, त्यानंतर ही घटना घडली. तिच्या गळ्यात ओढणी गुंडाळलेली होती. मुलीच्या वडिलांनी आरोप केला आहे की तिच्यावर बलात्कार झाल्यानंतर हत्या करण्यात आली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शवविच्छेदन अहवालात बलात्काराची बाब स्पष्ट झालेली नाही. मात्र, मुलीच्या एका डोळ्यावर सूज आणि ओठावर दाताच्या खुणा आढळल्या आहेत. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून म्हणजेच गुदमरून मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. मुलीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तिचा मृतदेह पिशवीत भरला आणि घाईघाईने तेथून पळू लागले. यावेळी मुलीची आई पोलिसांच्या पाठीमागून धावत होती. सुमारे 500 मीटर गेल्यानंतर पोलिसांनी मृतदेह कारमध्ये ठेवला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

पीडित मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत दिबियापूर गावात राहत होती. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ती गावाबाहेरील शेतात गेली होती. त्यादरम्यान तिचे वडीलदेखील शेतात कामाला गेले. ते शेतातून घरी परतले, मात्र त्यांची मुलगी तिथे नव्हती. तिचा शोध सुरू केला असता घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या बाजरीच्या शेतात मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला.

200 मीटरपर्यंत फरपटत नेल्याच्या खुणा
मृतदेह सापडलेल्या बाजरीच्या शेतात जवळपास 200 मीटरपर्यंत बाजरीची नासधूस झालेली असून मातीवर फरपटत नेल्याच्या खुणाही आढळल्या. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून काही पुरावेही गोळा केले आहेत. पोलिसांना काही अंतरावर चप्पल, अंडरगारमेंट याशिवाय इतर कपडेही सापडले आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांची 10 पथके तयार करण्यात आली आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत