5 Year Old Girl Assaulted By Minor
क्राईम देश

चिमुकलीसोबत नराधमाने ओलांडल्या क्रुरतेच्या मर्यादा, गुप्तांगांचा चावा, शरीरावर तब्बल २८ टाके…

मध्य प्रदेश : मध्यप्रदेशातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील शिवपुरीमध्ये अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत घृणास्पद कृत्य केले. त्याने ५ वर्षाच्या मुलीला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने क्रुरतेच्या मर्यादा ओलांडत चिमुकलीच्या गुप्तांगांचा चावा घेतला आणि नंतर तिचे डोके भिंतीवर आदळले. ती मृत पावल्याचे समजून आरोपीने तेथून पळ काढला. ही चिमुकली सध्या ग्वालियरमधील मधील कमलाराज रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दिनारा पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील आहे. १७ वर्षीय आरोपीने २२ फेब्रुवारी रोजी दारूच्या नशेत क्रुरतेच्या मर्यादा ओलांडल्या. २२ फेब्रुवारीला दुपारी आरोपीने ५ वर्षाच्या मुलीला फूस लावून एका रिकाम्या खोलीत नेले, तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार व मारहाण केली, नंतर त्याने तिचे डोके भिंतीवर आदळले. ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. मुलीच्या पालकांनी दोन तासांहून अधिक काळ तिचा शोध घेतला, त्यानंतर ती त्यांना रक्ताच्या थारोळ्यात आढळली. जेव्हा मुलीला शुद्ध आली तेव्हा तिने सांगितले की घटनेनंतर आरोपीने तिच्या गालावर दातांनी चावा घेतला आणि नखांनी तिला ओरबाडले. त्याने तिचे केस धरुन डोके भिंतीवर आपटले.

दरम्यान, चिमुकलीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, चिमुकलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला ग्वालियरमधील मधील कमलाराज रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. सुरुवातीला मुलीची प्रकृती गंभीर होती. तथापि, डॉक्टरांनी प्रयत्नपूर्वक तिची स्थिती स्थिर करण्यात यश मिळवले. तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या गुप्तांग आणि गुदद्वाराला गंभीर दुखापत झाली असल्याने शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी तिच्या पोटावर गुदद्वार बनवले आहे. जेणेकरुन तिच्या नियमित क्रियेत अडथळा येऊ नये. अंतर्गत दुखापतीमुळे वैद्यकीय पथकाला तिच्या गुप्तांगांवर २८ टाके घालावे लागले आणि कोलोस्टोमी करावी लागली. सध्या तिची प्रकृती स्थिर असून तिचे गुदद्वार सुस्थितीत येताच पोटावरील गुदद्वार हटवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या पीडिताची प्रकृती स्थिर आहे आणि डॉक्टरांच्या विशेष पथकाने तिची काळजी घेतली आहे.

आरोपीला दिनारा पोलिसांनी गावातूनच अटक केली. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. आरोपी अल्पवयीन असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याच्या मार्कशीटमध्ये त्याचे वय १७ वर्षे १० महिने नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्यावर प्रौढ म्हणून खटला चालवण्यासाठी अर्ज दाखल करायचा की नाही यावर विचार सुरु आहे. यावर आता न्यायालय कोणता निर्णय घेणार यावर सर्वांचे लक्ष आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत