मुंबई : शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलदगतीने तपास करण्यात येईल. याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना […]
ठाणे
संतापजनक घटना! गुरुपौर्णिमेच्याच दिवशी संतापजनक कृत्य, शिक्षिकेच्या पतीकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार
ठाणे : खासगी शिकवणीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवीयन विधार्थिनींवर वर्गातच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापजनक बाब म्हणजे खासगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षेकेच्या पतीने हे घृणास्पद कृत्य केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिक्षेकेच्या पतीविरोधात भारतीय न्याय संहितासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून […]
निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप केल्यावर सर्व उमेदवारांची स्थायी समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली. या बैठकीला केंद्रीय खर्च विषयक निरीक्षक चित्तरंजन माझी, केंद्रीय सर्वसाधारण निवडणूक राजनविर सिंग कपूर उपस्थित […]
राज ठाकरे हे कोत्या मनाचे नसून मोठ्या मनाचे व्यक्ती, मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंचे कौतुक
ठाणे : राज ठाकरे हे मोठ्या मनाचे व्यक्ती असून कोत्या मनाचे नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले असून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मनसेचे पदाधिकारी महायुतीचा प्रचार मनापासून करत असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, […]
ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश
ठाणे : ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश आलं आहे. ठाण्याची जागा शिवसेनाच लढणार असल्याची माहिती मिळाली आहे. लोकसभेसाठी आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के आणि मीनाक्षी शिंदे यांची नावं चर्चेत आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार राजन विचारे अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. विचारे […]
ठाणे शहरातील एका विहिरीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
ठाणे : ठाणे शहरातील एका विहिरीत बुधवारी सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही आत्महत्या असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या प्रकरणाचा अजून तपास सुरू आहे. अहवालानुसार, ठाणे महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी सांगितले की, कापूरबावडी परिसरातील शिवमंदिर परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह दिसल्याची माहिती त्यांना पहाटे ४:५७ वाजता मिळाली. घटनेची माहिती […]
ठाणे : मलंग किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला तरुणीचा मृतदेह
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील मलंग किल्ल्याच्या पायथ्याशी सुमारे २५ वर्षे वयाच्या एका तरुणीचा मृतदेह आढळला आहे. हिल लाइन पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गळा चिरलेल्या अवस्थेतील एक मृतदेह झुडपात नाल्याजवळ आढळून आला. दरम्यान, काही वाटसरूंनी हा मृतदेह पाहिला, त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. मृत तरुणीची ओळख […]
ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग मेट्रो प्रकल्प आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेवासियांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ‘ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प’ काळाची गरज असल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय शहरे विकासमंत्र्यांसमोर मांडला. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह मंत्रालयाने […]
ठाणे : खांबावर आदळल्यानंतर मोटारसायकलने घेतला पेट, 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
ठाणे : मोटारसायकल खांबावर आदळल्याने झालेल्या अपघातात एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर आज पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. मोटारसायकलस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती खांबाला आदळली आणि दुचाकीने पेट घेतला. मीरा रोड भागातील ही व्यक्ती आपल्या मोटारसायकलवरून घोडबंदर रोडवरून ठाण्याच्या दिशेने जात असताना मेट्रो मार्गाच्या एका खांबावर आदळून हा […]
ठाणे-नाशिक महामार्गाच्या आठ पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
ठाणे : ठाणे -नाशिक महामार्गावर पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आठ पदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लहान वाहनांना रस्ता मिळावा, यासाठी अवजड वाहने डाव्या बाजूने चालविण्यासंदर्भात सूचना देण्याचे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. तसेच या मार्गावरील खड्डे तातडीने मास्टिकने भरण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिल्या. […]









