The body of a person
ठाणे महाराष्ट्र

ठाणे शहरातील एका विहिरीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

ठाणे : ठाणे शहरातील एका विहिरीत बुधवारी सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही आत्महत्या असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या प्रकरणाचा अजून तपास सुरू आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अहवालानुसार, ठाणे महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी सांगितले की, कापूरबावडी परिसरातील शिवमंदिर परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह दिसल्याची माहिती त्यांना पहाटे ४:५७ वाजता मिळाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अंदाजे ४५ ते ५० वय असलेल्या माणसाचा मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश मिळाले, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत