Devendra Fadnavis
महाराष्ट्र मुंबई सोलापूर

मंगळवेढा सिंचन योजनेस लवकरच मान्यता, 24 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस अधिवेशन संपल्यानंतर सात दिवसांत मुख्यमंत्री यांची मान्यता घेऊन त्यानंतर सात दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी […]

Solapur St Bus Accident: More Than 35 Passengers Were Injured
महाराष्ट्र सोलापूर

सोलापूर-गाणगापूर बसचा अपघात, मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत दिले ‘हे’ आदेश

सोलापूर : सोलापूर-गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात ३५ हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास अक्कलकोट – मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी होऊन ही मोठी दुर्घटना घडली. या बसमध्ये जवळपास ७० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री […]

The task of maintaining social commitment through ISKCON temple - Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र सोलापूर

इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर : इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भुवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार […]

ashadhi ekadashi 2022 chief minister eknath shinde
महाराष्ट्र सोलापूर

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची सपत्नीक महापूजा!

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती. अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली. महापुजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत […]

Minister Eknath Shinde
महाराष्ट्र सोलापूर

आषाढी वारीच्या अनुषंगाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून प्रशासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात

सोलापूर : पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून व अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री एकनाथ […]

Deputy Chief Minister Ajit Pawar's instructions to take action to distribute land to Koyna project victims
महाराष्ट्र सातारा सोलापूर

कोयना प्रकल्पग्रस्तांना जमीन वितरण करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

मुंबई : कोयना धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना कृष्णा खोरे मध्ये समाविष्ट असलेल्या अथवा लगतच्या जिल्ह्यातच जमीन वितरण करावी. याबाबतची प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिल्या. कोयना धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

Solapur Malshiras Bjp Mla Ram Satpute Car Accident
महाराष्ट्र सोलापूर

मोठी बातमी! आमदार राम सातपुते यांच्या कारला अपघात, गाडीचे 3 टायर फुटल्याने घडला अपघात

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे भाजप आमदार राम सातपुते यांच्या गाडीला अपघात झाला आहे. राम सातपुते यांनीच फेसबुकवर व्हिडिओ शेअर करुन गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती दिली आहे. “मी सुखरूप आहे, मला कसल्याही प्रकारची इजा झालेली नाही. आतापर्यंत केलेलं काम आणि लोकांच्या आशीर्वादामुळे मी थोडक्यात बचावलो”, अशी प्रतिक्रिया अपघातानंतर त्यांनी दिली आहे. […]

Three children drown after not being able to swim
महाराष्ट्र सोलापूर

दुःखद! तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

सोलापूर : खेळत-खेळत शेततळ्याकडे गेलेल्या तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. मोहोळ तालुक्यातील शेटफळ इथे ही घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे. मृत कार्तिकचे वडील मुकेश ज्योतिनाथ हिंगमीरे यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे भाऊजी भरत निकम हे मोलमजुरीची कामे करण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील […]

Relief to Ajit Pawar clean chit from election officials
महाराष्ट्र सोलापूर

मुलांना शालेय शिक्षणाबरोबर चारित्र्य संपन्न घडवा, उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

सोलापूर : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देणे कर्तव्य आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नैतिक मूल्यांची वाढ, चारित्र्य संपन्न होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. जिल्हा परिषद शाळा पापरी ता. मोहोळ येथील स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. पवार म्हणाले, शिक्षक हे उद्याची पिढी घडवीत असल्याने अंधश्रद्धेला खतपाणी […]

Interstate gang of burglars arrested in Pune
महाराष्ट्र सोलापूर

दरोडा टाकून वृद्ध व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथील हिरजे वस्तीवर दरोडा टाकून वृद्ध व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी आतापर्यंत ६ गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. याबाबत  आज पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. या दरोडा प्रकरणात गुन्हेगारांचे धागे-दोरे मिळत नसल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. आता अखेर पोलिसांना या प्रकरणात मोठे यश मिळाले […]