पुणे : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजील उस्मानी विरोधात पुणे पोलिसांनी FIR दाखल केला आहे. याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेत उस्मानी याने प्रक्षोक्षक भाषण करून भावना दुखावल्याप्रकरणी गावडे यांनी स्वारगेट पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला […]
पुणे
एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
आज २६ जानेवारी २०२१ रोजी आपल्या देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुणे म्हणून माईर भौतिकोपचार महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ. आयुषी शहा व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य कर्नल डॉ. राजेंद्रप्रसाद गुप्ता व कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा नागरे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर संस्थेचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश घैसास, कार्यकारी संचालक डॉ. […]
प्रजासत्ताक दिनानिमित्त तळेगाव दाभाडे (पुणे) येथे रक्तदान शिबिर
पुणे : दि २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त तळेगाव दाभाडे, पोलीस ठाणे तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे-४१०५०६ येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी यांच्या वतीने गरवारे रक्त केंद्र व एम आय एम ई आर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने रक्त दान शिबिर सकाळी ८.३० ते दुपारी १२.०० पर्यंत असेल. […]
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : NCB पथकाचे पुण्यात छापे
पुणे : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) च्या पथकाने शनिवारी पुण्यातील हडपसर व खडकवासला परिसरात छापे टाकले. सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक अंमली पदार्थ तस्करांची नावे समोर आली होती. त्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकारांना अंमली पदार्थ पुरविणाऱ्यांबरोबच काही कलाकारांचीदेखील चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणात चिंकू पठाण […]
आता सामान्य नागरिकांना येरवडा जेलमध्ये जाता येणार – गृहमंत्री अनिल देशमुख
26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात ‘जेल पर्यटन’ सुरु करत आहोत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना इथे घडल्या आहेत. भारतात पहिल्यांदाच जेल पर्यटन हा उपक्रम सुरु केला जात आहे, असं गृहमंत्री देशमुख म्हणाले. विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि सामान्य नागरिकांना जेलमध्ये जाऊन ऐतिहासिक घटनांची माहिती […]
पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून होणार सुरू
पुणे : पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीत झालेल्या चर्चेनुसार याबाबत उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून […]
सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीत एक हजार कोटींचं नुकसान – आदर पुनावाला
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सीरमच्या आग लागलेल्या नव्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी या आगीत एक हजार कोटींचं नुकसान झालं आहे, अशी माहिती दिली. इमारतीतील साहित्य जळून खाक झालं आहे. बीसीजी लस आणि रोटाव्हायरस यावरील लसींचंही मोठं नुकसान झालं आहे, असं त्यांनी स्पष्ट […]
सीरमच्या आगीत 5 जणांचा मृत्यू, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती
पुणे : सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. जवळपास साडेतीन तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र या अग्नितांडवात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली. दुसरीकडे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मांजरी एसईझेड प्लँटमध्ये आग लागली. […]
‘सिरम’मधील आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने आपत्कालीन उपाययोजना राबवा – मुख्यमंत्री
मुंबई : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ दखल घेऊन पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत व अनुषंगिक आपत्कालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात, असे निर्देश दिले. […]
सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मांजरी येथील याच ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन केलं जात होतं. आग लागलेल्या इमारतीपासून जवळच प्रोडक्शन प्लांट असल्याची माहिती मिळत आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून […]









