Now ordinary citizens can go to Yerawada Jail - Home Minister Anil Deshmukh

आता सामान्य नागरिकांना येरवडा जेलमध्ये जाता येणार – गृहमंत्री अनिल देशमुख

पुणे महाराष्ट्र

26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात ‘जेल पर्यटन’ सुरु करत आहोत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना इथे घडल्या आहेत. भारतात पहिल्यांदाच जेल पर्यटन हा उपक्रम सुरु केला जात आहे, असं गृहमंत्री देशमुख म्हणाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि सामान्य नागरिकांना जेलमध्ये जाऊन ऐतिहासिक घटनांची माहिती घेता येईल “शाळा, कॉलेज व शैक्षणिक अस्थापना तसंच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभागाद्वारे जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे.” असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 26 जानेवारीपासून या जेल पर्यटनाच्या माध्यमातून नागरिकांना येरवडा कारागृहाची सफर घडवण्यात येणार आहे. महात्मा गांधी यांच्यासह अनेक नेते स्वातंत्र्य चळवळीदरम्यान येरवडा कारागृहात बंदिस्त होते. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील पुणे करार देखील येरवडा कारागृहातच पार पडला होता. स्वातंत्र्यानंतर अनेक महत्त्वाच्या खटल्यांमधे दोषी ठरलल्या गुन्हेगारांना या कारागृहात फाशी देण्यात आली. देशाचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी असलेल्या जिंदा आणि सुखा यांना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती.

तुरुंग प्रशासनाकडून गाईड देखील पुरवण्यात येणार आहे. एकावेळी 50 व्यक्तींना या कारागृह पर्यटनासाठी तुरुंगामध्ये सोडण्यात येईल. त्यासाठी किमान सात दिवस आधी इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीनं किंवा येरवडा कारागृहाच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्षपणे बुकींग करावं लागणार आहे. या कारागृह पर्यटना दरम्यान कोणतीही वस्तू , मोबाईल किंवा कॅमेरा आतमध्ये नेता येणार नाही. मात्र आतमध्ये गेलेल्या पर्यटकांचे फोटो काढण्याची सोय करण्यात येणार असून आतमध्ये काढलेले फोटो पर्यटकांना नंतर पुरवण्यात येणार आहेत. 26 जानेवारीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या उपक्रमाचं उद्घाटन करतील.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत