blood donation camp on Sunday 28th March 2021 at Rajgurunagar
पुणे महाराष्ट्र रक्‍तदान

रक्तदान : राजगुरूनगर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या वतीने राजगुरूनगर येथे भव्य रक्तदान शिबिर

पुणे : रविवार दि २8 मार्च २०२१ रोजी राजगुरूनगर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगर यांच्या वतीने गरवारे रक्त केंद्र व एम आय एम ई आर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अन्नदान, वस्त्रदान, धांडं, श्रमदान मूलभूत गरज भागवतात. परंतु, रक्तदान प्राण वाचवतं. १ वेळा रक्तदान […]

social activist Vilas Wagh dies due to Corona
पुणे महाराष्ट्र

ज्येष्ठ समाजसेवक प्रा. विलास वाघ यांचे कोरोनामुळे निधन

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक प्रा. विलास वाघ यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. पुण्यातील भारती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ता आणि इतरांना आधार देणारा सच्चा समाजसेवक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. प्रा. विलास वाघ‌ विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांद्वारे […]

holi celebrations banned
कोरोना पुणे महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होली व धूलिवंदनास मनाई; नियमांचे उलंघन केल्यास होणार कठोर कारवाई

पुणे : राज्यात तसेच पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव झपाट्याने पसरण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याचे नमूद करत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात होळी व धूलिवंदन साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे शहरासाठी पालिका आयुक्तांनी अशाच प्रकारचे आदेश काढले आहेत. खबरदारीचे उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक […]

Pune woman Suicide due to constant harassment and humiliation
पुणे महाराष्ट्र

पुण्यात सततच्या छळ आणि अपमानाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे : सासरी होणाऱ्या सततच्या छळाला आणि अपमानाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आंबेगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी या महिलेचे वडील विलास पंडित यांनी तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता अनिल व्हावळे (वय २६) […]

india vs england
क्रीडा पुणे महाराष्ट्र

Ind vs Eng 1st ODI : भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सामने आजपासून होणार सुरु.. जाणून घ्या.

पुणे : India vs England 1st ODI – भारत-इंग्लंड संघांमधल्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला आजपासून पुण्यातल्या गहुंजेच्या एमसीए स्टेडियवर सुरुवात होत आहे. दुपारी दीड वाजता होणार सामन्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेतला पहिला सामना आज, तर उर्वरित दोन सामने 26 आणि 28 मार्च रोजी खेळवण्यात येतील. ही मालिका जिंकून इंग्लंडविरुद्ध विजयाची हॅटट्रिक साधण्याचा टीम […]

The girl got stuck in the window as she tried to escape from the quarantine center
पुणे महाराष्ट्र

क्वारंटाइन सेंटरमधून पळून जाण्याच्या नादात तरुणी अडकली खिडकीच्या गजांमध्ये…

पुणे : पुण्यात एका 18 वर्षीय तरुणीला क्वारंटाइन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न करणं चांगलंच महागात पडलं. ही मुलगी खिडकीतून पळून जाण्याचा विचार करत होती. मात्र खिडकीतुन बाहेर निघताना ती खिडकीच्या गजांमध्ये अडकून बसली. तिला तेथून आत जाता येत नव्हतं आणि बाहेरही येता येत नव्हतं. पुणे शहरातील एरंडवणे भागातील बमहीला सेवा मंडळाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये रात्री साडे […]

A huge fire broke out in the camp area market in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात कॅम्प परिसरातील मार्केटला भीषण आग, २५ दुकाने जळून खाक

पुणे : कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला पहाटे पावणे चारच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत मार्केटमधील मासे आणि चिकनची अंदाजे २५ दुकाने पूर्णपणे जळाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन विभागाच्या आठ गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या ब्रिटिश कालीन […]

Gopichand Padalkar arrested in MPSC agitation
पुणे महाराष्ट्र

MPSC आंदोलन प्रकरणात गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊ जणांना अटक

पुणे : MPSC ची नियोजित परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती मिळाल्यावर पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले. यावेळी आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते. या आंदोलकांनी तब्बल आठ तास संपूर्ण लाल बहादूर शास्त्री रस्ता रोखून धरला होता. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांची धरपकड केली […]

a housemaid committed suicide by jumping from a building in pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात घरकाम करणाऱ्या तरुणीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पुणे : घरकाम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हडपसर येथील पांढरे मळा परिसरात राहणाऱ्या या तरुणीने काल (७ मार्च) संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास इमारतीवरून उडी मारली. दरम्यान, आसपास राहणाऱ्या नागरिकांनी तत्काळ या तरुणीला रुग्णालयात नेले. मात्र, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बू शेख नावाची […]

actor shrikant moghe passes away in pune
पुणे मनोरंजन महाराष्ट्र

रंगभूमी, चित्रपट सृष्टीने मार्गदर्शक, चतुरस्र अभिनेता गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचा रूबाब वागवणारा, चतुरस्र अभिनेता गमावल्याची भावना व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोघे यांच्या निधनामुळे कला क्षेत्राला मार्गदर्शकाची उणीव भासत राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांपैकी ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत […]