पुणे : राजेश देशमुख जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये चेतन जेधे यांची निवड जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सदस्य म्हणून करण्यात आली आहे. या समिती मध्ये जिल्हातील राज्यसभा व लोकसभा सदस्य शरद पवार, प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे, गिरीश […]
पुणे
महसूलमंत्र्यांकडून गिते यांच्या व्यसनमुक्ती कामाचे कौतुक..
पुणे, ता. 11 : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्री. सोमनाथ गिते यांच्या लिखाणाचे कौतुक केले आहे. गिते यांनी मागील काही काळांपासून व्यसनमुक्तीवर सातत्याने लिखाण केले आहे. यामधून त्यांनी तंबाखू, सिगारेट, दारूसारख्या व्यसनाधीनतेतून समाजाचे झालेले नुकसान आणि सद्यस्थिती मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. वर्तमानपत्रे व अन्य काही माध्यमांतून त्यांनी व्यसनामुळे समाजाच्या झालेल्या नुकसानाचे भीषण वास्तव […]
रेल्वेच्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड दुहेरी ब्रॉडगेजलाईनचे पहिले खरेदीखत पूर्ण
पुणे, दि. 7 : रेल्वेच्या पुणे- नाशिक सेमी हायस्पीड दुहेरी ब्रॉडगेज लाईनच्या बांधकामासाठी खासगी वाटाघाटीद्वारे जमीनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून याअंतर्गत संपूर्ण प्रकल्पातील पहिले खरेदीखत आज पूर्ण झाले. या प्रकल्पासाठी खरेदीने जमीन दिलेल्या चंद्रकांत गंगाराम कोलते आणि स्मिता चंद्रकांत कोलते यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या खरेदीखतासाठी पुढाकार घेतलेल्या भूसंपादन […]
वर्क फ्रॉम नेचर, वर्क विथ नेचर संकल्पनांना पर्यटकांचा प्रतिसाद, एमटीडीसीच्या पुणे विभागाची सर्वोत्तम कामगिरी
पुणे : कोरोना संकटाचे परिणाम कमी झाल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पुणे विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे पुणे विभागातील पर्यटक निवासांना पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. महामंडळाच्या अर्धवार्षिक आढाव्यामध्ये पुणे विभागातील पर्यटक निवास सरस ठरली आहेत. विभागाने राबविलेल्या नवनवीन संकल्पना, कोरोना रोखण्यासाठी राबविलेल्या उपाययोजना, पर्यटकांना दिलेल्या सर्वोत्तम सुविधा यामुळे या विभागातील पर्यटक निवासांना पर्यटकांनी पुन्हापुन्हा भेट […]
कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यातील चार मोठ्या हॉटेलवर कारवाई
पुणे : सर्वत्र कोरोनाचा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे नियम कडक करण्यात आले आहेत. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील चार मोठ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने काही नियम व मार्गदर्शक सूचना […]
‘अनाथांची मातृदेवता हरपली ..!’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली
‘सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण […]
अनाथांची माय हरपली, जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (माई) यांचं निधन
पुणे : राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवणाऱ्या, अवघं आयुष्य अनाथांच्या सेवेमध्ये झिजवणाऱ्या ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं आज निधन झालं. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज ह्रदयविकाराच्या झटक्याने […]
पुण्यातील हॉटेल वैशाली, रुपालीचे मालक जगन्नाथ शेट्टी यांचे निधन, अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
मुंबई : पुण्यातील सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक, हॉटेल ‘वैशाली’चे मालक जगन्नाथ शेट्टी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं असून सचोटीने व्यवसाय करत पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श हॉटेल व्यावसायिक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात […]
पुण्यात डॉ. ललिता बोरांना मोठे यश, तंबाखूला पर्याय ठरलेल्या ‘समर्थ विड्याला’ पेटंट
पुणे, ता. १३ : कोरोनाच्या आधीपासूनच तंबाखूच्या आहारी गेलेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. सिगारेट ओढण्याचे आणि तंबाखू खाण्याचे प्रमाण कोरोनानंतर वाढल्याचे दिसून येते. यामुळे दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे आता तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाला दूर ठेवण्यासाठी ‘समर्थ विडा’ हा पर्याय ठरणार आहे. डॉ. ललिता बोरा यांच्या तंबाखूला पर्याय ठरेल अशा ‘समर्थ विडा’ या अभिनव […]
पुण्यात तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या, समोर आली धक्कादायक माहिती
पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुण बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी व्यावसायिकावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या. त्यामुळे संबंधित व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस चौकीपासून जवळच ही घटना घडली. समीर मनूर शेख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. […]










