मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळामार्फत www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाल यांनी दिल्याचे मुंबई विभागीय सचिव […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, अवधान गावातील मतदानाबाबत खुलासा
धुळे : ०६ – धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात २०२४ ची निवडणूक शांततेत पार पडली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान २० नोव्हेंबर २०२४ रोजी व मतमोजणीची २३ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रक्रिया पार पडली. यानंतर सोशल मीडियावर धुळे ग्रामीण मतदार संघातील अवधान मतदान केंद्रातील आकडेवारीबाबत अफवा व नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचे निदर्शनास […]
आपल्या आवडीच्या वाहन नोंदणी क्रमांक आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा, अशाप्रकारे क्रमांक करा आरक्षित…
मुंबई : नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येते. लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षित नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येणार आहेत. त्यासाठी वाहन धारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही. पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी राज्यातील सर्व परिवहन […]
मतदानानंतरही ईव्हीएम पॉवरपॅक स्थिती ९९% दिसणे तांत्रिकदृष्ट्या वस्तुस्थितीजन्य -निवडणूक निर्णय अधिकारी, अणुशक्ती नगर
मुंबई : मतदानानंतरही ईव्हीएम पॉवरपॅक स्थिती 99% दिसणे ही बाब तांत्रिकदृष्ट्या वस्तुस्थितीजन्य असल्याचे 172-अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी 172- अणुशक्तीनगर मतदारसंघातील मतदान केंद्रात मतदानादिवशी ईव्हीएम मशीन पूर्ण दिवस वापरल्यानंतरही काही CUs मध्ये EVM पॉवर पॅक स्थिती 99% दर्शविली गेली याबाबत एक उमेदवार यांनी आक्षेप नोंदविला […]
बाळासाहेब थोरातांचा पराभव, अमोल खताळ ठरले जायंट किलर
अहिल्यानगर : संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला आहे. तर पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल खताळ जायंट किलर ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं असून त्याचा निकाल आज २३ नोव्हेंबर रोजी लागत आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार झाली. सुरुवातीपासूनच महायुतीने आघाडी घेतली होती. ती आघाडी कायम ठेवत आता भाजपने तब्बल महायुतीने […]
‘हा जनतेचा निर्णय नाही’, निवडणुकीच्या निकालांवर संजय राऊतांचा आक्षेप
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे कि, आपण जो निकाल पाहतोय त्यावरून काहीतरी गडबड असल्याचे दिसत आहे. हा जनतेचा निर्णय नाही. इथे काय चूक आहे ते प्रत्येकाला समजेल. महायुतीने असं काय केलं की, त्यांना १२० पेक्षा जास्त जागा मिळत आहेत? महाराष्ट्रात महविकास आघाडीला ७५ जागाही मिळत नाही […]
आचारसंहिता भंगाच्या ७३६० तक्रारी निकाली; ५४६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ७ हजार ४०० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ७ हजार ३६० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप […]
मुंबई शहर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. […]
टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल प्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई : पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे यांनी २३१-आष्टी विधानसभा मतदार संघ, जिल्हा बीड या मतदार संघासाठी टपाली मतपत्रिकेव्दारे मत नोंदविल्यानंतर, त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे कायदेशीर आदेशाची अवज्ञा केली तसेच मतदानाची गोपनियता भंग केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती १८५ […]
विधानसभा निवडणुकीसाठी ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. यानंतर जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ […]








