पुणे महाराष्ट्र

पुण्यात धक्कादायक प्रकार! हरभरे खाल्ले नाहीत म्हणून पत्नीकडून पतीला बेदम मारहाण, घाबरलेल्या पतीची पोलिसात धाव

पुणे : पुणे शहरातील सोमवार पेठ भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरुन पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. या महिलेने लाटणं आणि मिक्सरच्या भांड्याने पतीला बेदम मारहाण केली, तसेच करंगळीचा चावा घेऊन नख देखील तोडले. या प्रकरणी सोमवार पेठ येथील त्रिशुंड गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या ४४ वर्षीय व्यक्तीकडून […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर गिरीश महाजनांची माहिती, समन्वयाचा अभाव पण महायुतीत मतभेद नाही…

मुंबई : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावी गेले असताना त्यांची तब्येत बिघडली आणि तिथेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर ते ठाण्यात आपल्या निवासस्थानी पोहोचले. पण, अद्यापही शिंदेंना विश्रांतीची गरज असल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान, भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी सत्तास्थापनेत […]

महाराष्ट्र मुंबई

महायुतीची बैठक रद्द, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गावाकडे रवाना

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सकाळी नवी दिल्लीहून मुंबईत परतले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभराने ते सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी जात आहेत. सरकार स्थापनेबाबत महायुतीची पुढील बैठक शुक्रवारी मुंबईत होणार असल्याचे शिंदे यांनी गुरुवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले होते. परंतु, मुंबईत आज होणाऱ्या महायुतीच्या दोन्ही बैठका रद्द करण्यात […]

Shivshahi Bus Accident In Gondia Death Toll Might Increase
महाराष्ट्र

गोंदियात शिवशाही बस उलटली, भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

गोंदिया : गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ आज दुपारी 1 च्या सुमारास नागपुरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटली. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले असून बचाव कार्य सुरु करण्यात […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे करायला हवे होते, शिवसेनेच्या उबाठा गटाची काँग्रेसवर टीका

मुंबई : महाराष्ट्राच्या निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर महाविकासआघाडीमध्ये खटके उडताना दिसत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असताना आता शिवसेनेच्या उबाठा गटाने पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, त्यांच्या ‘अतिआत्मविश्वासामुळे’ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कामगिरीला धक्का बसला आहे. मुंबईत […]

पुणे महाराष्ट्र

पुणे : बैलाच्या दोरीत अडकून चिमुकल्याचा हृदयद्रावक मृत्यू, बैल पळत सुटला आणि…

पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील फुलगाव या गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अंगणात खेळत असणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाने बैलाला बांधलेली दोरी हातात घेतली आणि बैल पळत सुटला. ती दोरी मुलाभोवती गुंडाळली गेली आणि दोरीबरोबर मुलगा देखील फरपटत गेला. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. शौर्य शैलेश वागस्कर (वय […]

Ajaz Khan
महाराष्ट्र मुंबई

अभिनेता एजाज खानची पत्नी फेलॉनला अटक, पोलिसांना घरात सापडले लाखोंचे ड्रग्स

मुंबई : अभिनेता एजाज खाननं नुकतीच विधानसभा निवढणूक लढवली होती. परंतु आता एजाज खानच्या पत्नीला पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे अभिनेता एजाज खान यापूर्वी अनेकदा ड्रग्ज केसमुळं वादात अडकलेला आहे. एजाज खानची पत्नी फेलॉन गुलीवाला हिला पोलिसांनी अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महिन्यापूर्वी एजाजच्या अंधेरीतल्या ऑफिसमध्ये एका कर्मचाऱ्याच्या […]

अहिल्यानगर महाराष्ट्र

…अन्यथा बाळासाहेब थोरातांच ‘ते’ स्वप्न आम्ही निश्चितच पुर्ण केल असतं – राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर : विधानसभेत यश मिळाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी त्यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांना अनेक विषयांवर प्रतिक्रीया दिल्या. ते म्हणाले कि, “माझ्यामागे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा नेहमीच आशिर्वाद राहिलाय. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा देखील आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यांनी मला दिलेल्या संधीच सोनं […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

एक दिवस ठाकरे कुटुंबासह देश सोडतील, शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

शिर्डी : शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. मी तुम्हाला पुढचं भविष्य सांगतो, एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या फॅमिलीला घेऊन देश सोडून जातील. माझे शब्द तुमच्याकडे लिहून ठेवा. ज्यांनी बाळासाहेबांशी बेईमानी केली, शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी जे पाप केलं, त्या […]

Eknath Shinde's resignation as Chief Minister
महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

मुंबई : १४ व्या विधानसभेची मुदत आज २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान शिवसेना पक्षाकडून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद देण्यात यावे, यासाठी दबाव टाकला जात आहे. तर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले जावे, अशी मागणी होत आहे. आज महायुतीचे नेते राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार असून […]