पुणे महाराष्ट्र

पुण्यात धक्कादायक प्रकार! हरभरे खाल्ले नाहीत म्हणून पत्नीकडून पतीला बेदम मारहाण, घाबरलेल्या पतीची पोलिसात धाव

पुणे : पुणे शहरातील सोमवार पेठ भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरुन पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. या महिलेने लाटणं आणि मिक्सरच्या भांड्याने पतीला बेदम मारहाण केली, तसेच करंगळीचा चावा घेऊन नख देखील तोडले. या प्रकरणी सोमवार पेठ येथील त्रिशुंड गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या ४४ वर्षीय व्यक्तीकडून त्याच्या चाळीस वर्षीय पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एक डिसेंबरला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. तक्रारदाराने घरात मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरून त्यांच्या पत्नीने शिवीगाळ करून त्यांना लाटण्याने तळ हातावर, डोक्यात, पाठीवर मारले. तक्रारदाराने पत्नीच्या हातातील लाटणे हिसकावून घेतले. त्यामुळे चिडलेल्या पत्नीने मिक्सरचे भांडे घेऊन दोन वेळा तक्रारदाराच्या डोक्यात मारले. त्यानंतर पत्नीने तक्रारदाराची पॅंट खाली ओढल्यामुळे तक्रारदार खाली बसले आणि स्वरक्षणासाठी दोन्ही हात वर करून डोके झाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्नीने रागाच्या भरात पतीच्या हाताच्या करंगळीला चावून नख तोडले. तसेच, हाताच्या नखांनी तोंडावर, गालावर, डाव्या कानाच्या पाठीमागे तसेच पोटाला ओरखडले. या घटनेनंतर घाबरलेल्या पतीने पोलिसात धाव घेतली. पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगत तक्रार दाखल केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत