महाराष्ट्र मुंबई

महायुतीची बैठक रद्द, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गावाकडे रवाना

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सकाळी नवी दिल्लीहून मुंबईत परतले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभराने ते सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी जात आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सरकार स्थापनेबाबत महायुतीची पुढील बैठक शुक्रवारी मुंबईत होणार असल्याचे शिंदे यांनी गुरुवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले होते. परंतु, मुंबईत आज होणाऱ्या महायुतीच्या दोन्ही बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. आज होणारी शिवसेना आमदारांची बैठकही रद्द करण्यात आली आहे. तथापि, शिवसेनेचे प्रमुख असलेले काळजीवाहू मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावाला भेट देत असून ही बैठक आता रविवारी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत