प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाने महाराष्ट्र पोलीस दलातील ५७ अधिकारी, अंमलदारांची शौर्य पदकासाठी, उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांसाठी आणि गुणवत्तापूर्ण सेवेप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पोलीस पदकासाठी निवड केली. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. “शौर्य, कर्तबगारीमध्ये महाराष्ट्र पोलीस नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळेच आपल्या पोलिसांनी गणराज्यदिनी १३ शौर्य पदके, विशेष सेवेची […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
प्रजासत्ताक दिनानिमित्त तळेगाव दाभाडे (पुणे) येथे रक्तदान शिबिर
पुणे : दि २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त तळेगाव दाभाडे, पोलीस ठाणे तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे-४१०५०६ येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी यांच्या वतीने गरवारे रक्त केंद्र व एम आय एम ई आर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने रक्त दान शिबिर सकाळी ८.३० ते दुपारी १२.०० पर्यंत असेल. […]
कुणी काय लपवाछपवी केली, कुणाचं लग्न झालं होतं, झालं नव्हतं, हे सांगू का? अजित पवारांनी दिला इशारा
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आले आहेत, असं असलं तरीही विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलं आहे. मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केली, मला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, सांगू का?, असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे. अजित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद […]
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : NCB पथकाचे पुण्यात छापे
पुणे : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) च्या पथकाने शनिवारी पुण्यातील हडपसर व खडकवासला परिसरात छापे टाकले. सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक अंमली पदार्थ तस्करांची नावे समोर आली होती. त्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकारांना अंमली पदार्थ पुरविणाऱ्यांबरोबच काही कलाकारांचीदेखील चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणात चिंकू पठाण […]
जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. नारळीकर यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा आज नाशिकमध्ये करण्यात आली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिक ठाले पाटील यांनी याबाबत घोषणा केली. 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये 26, 27, 28 मार्चला होणार आहे. कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, नारळीकर यांच्या पत्नी […]
राज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधणार – गृहमंत्री अनिल देशमुख
नागपूर : पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी घरे आहेत. पोलीस दलाची घरांची वाढती मागणी पाहता राज्य पोलीस दलासाठी एक लाख घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केली. नागपुरातील पोलीस महासंचालक कार्यालय आणि पाचपावली तसेच इंदोरा येथील पोलीस अंमलदारांच्या निवासस्थानाचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर […]
२५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या मुंबईतील राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमात ई-ईपिक वाटपाचा प्रारंभ
मुंबई : राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने येत्या सोमवारी (25 जानेवारी) राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे 25जानेवारी रोजी राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली. या दिवसापासून भारत निवडणूक आयोग ई-मतदार ओळखपत्राचे (ई-ईपिक) वाटप सुरु करणार असून मतदारांना त्यांचे मतदार […]
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘या’ विद्यापीठाला स्वतंत्र इन्क्युबेशन सेंटर म्हणून मान्यता
मुंबई : राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने SNDT महिला विद्यापीठाला (एसएनडीटी विद्यापीठ) महिलांकरिता एक स्वतंत्र इन्क्युबेशन सेंटर म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. एसएनडीटी हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ असून महाराष्ट्रातील एकमेव शासकीय […]
तोरणमाळ घाटात जीप दरीत कोसळून भीषण अपघात, ६ मजुर ठार
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अतिशय भीषण अपघात झाला आहे. तोरणमाळ घाटातील खडकी रस्त्यावर एक जीप 70 फुट खोल दरीत कोसळली आहे. यात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्यातील सीमावर्ती भागातील खडकी गावातून तोरणमाळ येथे कामाला जात असताना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मजुर घेऊन जाणारी जीप 70-80 दरीत कोसळल्याने […]
महत्वाची बातमी : महापोर्टलऐवजी आता ‘या’ चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून होणार भरती प्रक्रिया
राज्यातील रखडलेल्या नोकरभरतीला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील 8500 आणि पोलीस विभागातील 5297 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. परंतु राज्य सरकार महापोर्टलऐवजी चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया करणार आहे. महापोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या नोकर भरतीला अनेकांनी विरोध केला होता. त्यामुळे राज्य सरकारने महापोर्टल रद्द करुन चार कंपन्यांची निवड केली आहे. निवडण्यात आलेल्या […]










