मुंबई : कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 चे लोकार्पण वर्षा येथील समिती कक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. महावितरणने तयार केलेल्या कृषी ऊर्जा अभियान धोरण 2020 वेब पोर्टल, सौर ऊर्जा लॅण्ड […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
गृहमंत्रीजी, तर आपण बदनामीकारक मजकूर कधीच ट्विटमध्ये वापरला नसता, चंद्रकांत पाटील यांची टीका
भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी पक्षाच्या संकेतस्थळावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याप्रकरणी सर्वत्र चर्चा सुरू आहे. याप्रकरणाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला. परंतु आता देशमुख यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. वेबसाइटवर ‘तो’ आक्षेपार्ह शब्दप्रयोग भाजपकडून झालेला नाही – रक्षा खडसे चंद्रकांत पाटील यांनी ट्विट […]
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला काडीचाही अर्थ नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चर्चेत असताना आता याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला काडीचाही आधार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच कर्नाटकचा मुंबईशी संबंधच येत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
वेबसाइटवर ‘तो’ आक्षेपार्ह शब्दप्रयोग भाजपकडून झालेला नाही – रक्षा खडसे
जळगाव : भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख असल्याचे स्क्रीनशॉट समोर आले होते. यावर स्वतः रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं कि, “आपण पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. हा प्रकार भाजपकडून झालेला नाही” “भाजपच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत मला काल सायंकाळी माहिती मिळाली. त्यानंतर […]
लैंगिक शोषण प्रकरणात नागपूर खंडपीठाच्या ‘त्या’ वादग्रस्त निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
नवी दिल्ली : अल्पवयीन मुलीच्या अंगावरील कपडे न काढता तिच्या मर्जीशिवाय शरीराला हात लावण्याची क्रिया म्हणजे लैंगिक शोषण नव्हे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या या वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नागपूर खंडपीठाच्या निकालामुळे धोकादायक उदाहरण प्रस्थापित होईल, असं अॅटर्नी जनरल यांनी आपल्या निवेदनात म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या वादग्रस्त निर्णयाला स्थगिती […]
राष्ट्रवादीला धक्का, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
सोलापूर : सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उद्या (28 जानेवारी) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. मोहिते पाटील अगोदर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आता ते काँग्रेसमध्ये जाणार आहेत. डॉ धवलसिंह यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भाजपसह असलेल्या […]
पद्म पुरस्कारांवरून राज्य सरकारने व्यक्त केली नाराजी, शिफारशी डावलल्याचा आरोप
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील 119 कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्रातील 6 जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पण पद्म पुरस्काराविषयीच्या राज्य सरकारच्या शिफारशी केंद्राने डावलल्याचा आरोप आता महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. राज्यातील ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. त्यात उद्योगपती मुकेश अंबानी […]
केंद्राच्या शेतकरी कायद्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे निव्वळ ‘नौटंकी’ आणि ‘तमाशा’ : प्रकाश आंबेडकर
अकोला : नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसेवर देशभरात केंद्र आणि भाजपवर टीका होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करतांनाच काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप लावले आहेत. केंद्राच्या शेतकरी कायद्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे निव्वळ ‘नौटंकी’ आणि ‘तमाशा’ असल्याची बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. केंद्राच्या सध्याच्या […]
एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
आज २६ जानेवारी २०२१ रोजी आपल्या देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुणे म्हणून माईर भौतिकोपचार महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ. आयुषी शहा व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य कर्नल डॉ. राजेंद्रप्रसाद गुप्ता व कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा नागरे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर संस्थेचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश घैसास, कार्यकारी संचालक डॉ. […]
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात मनसेकडून फसवणूकीची तक्रार दाखल
मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात आज मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीमध्ये सरकारने वीजबिल प्रकरणी लवकरच ग्राहकांच्या हिताचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं. परंतु, अद्याप याबाबत काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यांनी एकप्रकारे ग्राहकांचा विश्वासघात केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून याआधी अनेकवेळा सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. […]










