जळगाव : एका तरुणाने पत्नीची बाजारात दिवसाढवळ्या चॉपरने भोसकून हत्या केली. बुधवारी दुपारी १.३० वाजता पाळधी गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. त्यानंतर आरोपीने पत्नीच्या माहेरी जाऊन मेहुण्यावर चॉपरने वार केले. त्यानंतर पत्नी जिंवत आहे का ते पाहण्यासाठी पुन्हा हा तरुण बाजारात आला, त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेत पूजा […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळले, राजेश टोपे यांनी दिली ‘ही’ माहिती
मुंबई : राज्यातील सात जिल्ह्यांत आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या सर्व रुग्णांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. सर्वांना लगेचच विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. यातील काही रुग्ण बरे झालेले आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे […]
आशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ, संप मागे
मुंबई : राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता अशी १५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केला. ‘आशां’ना विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेअंती आशा आणि […]
राज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल शिधापत्रिका
मुंबई : राज्यातील अनाथांना स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी अशी मागणी अनेक वर्ष केली जात होती. याबाबत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरण करण्याबाबतचा निर्णय प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत घेतला आहे. राज्यातील २८ वर्षापर्यंतच्या अनाथांना बीपीएल शिधापत्रिकेबरोबर त्याचे लाभ मिळतील व २८ वर्षावरील अनाथांना […]
मोठी बातमी : महाराष्ट्र वस्तु व सेवाकर (GST) सुधारणा विधेयकाच्या प्रारुपास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई : करदाते व वस्तु आणि सेवा कर विभाग यांच्यामध्ये भविष्यात उद्भवणारे वाद कमी होऊन कार्यपद्धती अधिक सुलभ करण्याच्या तसेच करदात्याचे हित जोपासण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र वस्तु व सेवा कर (सुधारणा) विधेयक २०२१ च्या प्रारुपास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यामध्ये संपूर्ण कर दायित्वाऐवजी निव्वळ देय रकमेवरील […]
23 जून 2021 : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय
मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळीचा पुनर्विकास म्हाडा करणार मुंबई येथील गोरेगांवमधील सिध्दार्थनगर (पत्राचाळ) येथील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करुन हजारो कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुनर्विकासाचे काम कालबद्धरितीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. म्हाडा या प्रकल्पाचा स्वत: विकास करेल. हे करीत असतांना पत्राचाळ येथील मूळ 672 गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा हिस्सा / […]
चिंतेत भर! महाराष्ट्रात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये आढळला ‘निपाह विषाणू’
महाबळेश्वर : महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात प्रथमच निपाह विषाणू आढळल्याची घटना घडली असून भीती व्यक्त करण्यात येत आहे. मार्च २०२० मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ सापडले होते. देशात […]
नागपूरमधील ‘ते’ हत्याकांड अनैतिक संबंधातून, पोलीस तपासात समोर आली माहिती
नागपूर : नागपूरच्या गोळीबार चौकातील बागल आखाड्याजवळ काल २१ जून रोजी घडलेल्या हत्याकांडाने सर्वत्र खळबळ उडाली. एका व्यक्तीने पत्नी, दोन मुलं, सासू आणि मेहुणीची निर्घृण हत्या करून नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. आलोक माथुरकर (४५) असे या व्यक्तीचे नाव असून त्याने पत्नी विजया (४०), मुलगी परी (१४), मुलगा साहिल (१०), सासू लक्ष्मीबाई बोबडे (५५) आणि […]
गतिमंद मुलाच्या चिंतेने ग्रासलेल्या वडिलांनी ‘फादर्स डे’च्या दिवशीच केलं भयंकर कृत्य…
मुंबई : मुलुंड येथे एका पित्याने ‘फादर्स डे’च्या दिवशी आपल्या गतिमंद मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आपल्या मृत्यूनंतर गतिमंद मुलाचा सांभाळ कोण करेल? या चिंतेने ग्रासल्यामुळे वडिलांनी हे कृत्य केले. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत याबाबत सांगितले आहे. योगेश भट्ट (३५) असे मृत मुलाचे नाव असून दशरथ भट्ट (६७) असे त्याच्या वडिलांचे […]
ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे मजुराच्या मुलीची आत्महत्या
नांदेड : ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे एका मजुराच्या 17 वर्षीय मुलीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी घरच्यांकडे मोबाइल मागितला, पण वेळेत मोबाइल न मिळाल्याने अकरावीत शिकणाऱ्या बिद्धशीला पोटफोडे या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरातील फुलेनगर वसाहतीत ही घटना घडली. बुद्धशिलाने ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. […]









