मुंबई : राज्यातील सुपर मार्केटमध्ये मद्य (वाईन) विक्रीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. या निर्णयाबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर मद्य (वाईन) विक्रीबाबत यथायोग्य निर्णय घेण्यात येईल. जनतेला नको असलेले निर्णय लागू करण्याची राज्य सरकारची भूमिका नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. अजित पवार यांनी पुढे सांगितले की राज्यात […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
देशाच्या निर्यात क्षेत्रात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, निती आयोगाचा ‘निर्यात सज्जता निर्देशांक’जाहीर
नवी दिल्ली : निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने निती आयोगाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशांक-२०२१’ अहवालात 77.14 गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे. देशाच्या निर्यात क्षेत्रात झालेल्या प्रगतीच्या आधारावर, निती आयोगाने आज ‘निर्यात सज्जता निर्देशांक-२०२१’ (Export Preparedness Index) (दुसरी आवृत्ती) जाहीर केला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, केंद्रीय […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महायुवा ॲप’चे अनावरण
मुंबई : शासकीय योजना, रोजगार संधी आणि पदवीधर तरुण यांच्यादरम्यान दुवा ठरू शकेल अशा ‘महायुवा’ ॲपचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधान भवन समिती सभागृहात अनावरण करण्यात आले. या ॲपवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीत माहिती असेल. पदवीधर या ॲपवर आपले प्रोफाईल तयार करतील. त्यांच्याकडील विशेष प्राविण्य व आवडीचे क्षेत्र याबद्दलची माहिती अपलोड करेल. या आधारे […]
जितेंद्र आव्हाड यांनी केला मोठा खुलासा, आमदारांना ‘ती’ घरे मोफत देण्यात येणार नसून…
मुंबई : राज्यातील आमदारांसाठी मुंबईत ३०० घरे बांधण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आल्यानंतर कालपासून सरकारवर जोरदार टीका होत आहे. त्यातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आमदारांना ही घरे मोफत दिली जाणार नसून त्यांच्याकडून पैसे घेण्यात येणार आहेत, असा खुलासा त्यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत सांगितले […]
पुणे हादरले! वडिलांनीच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, स्वतःच्या मुलाविरुद्ध आईने केली तक्रार
पुणे : पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच बलात्काराच्या घटनांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील सुस गाव परिसरात वडिलांनीच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये या नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या वृद्ध आईनेच याबाबत फिर्याद दिली असून हे प्रकरण उजेडात […]
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर
मुंबई : राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या कार्यालयीन कामकाजात आणि जनसंवाद व जनहिताशी संबंधित बाबींमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी तरतूद करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणे (राजभाषा) अधिनियम, 2022 हे विधेयक मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी प्रथम विधानसभेत व त्यानंतर विधानपरिषदेत मांडले. दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. शाळांमध्ये मराठी भाषेचा वापर होण्यासंदर्भात […]
महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील गावांच्या समस्यांचा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतला आढावा
अहमदनगर : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा शासनाचा महत्त्वाचा प्रकल्प असून दर्जाच्या दृष्टीने देशातील सर्वोत्तम प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामुळे कोपरगाव तालुक्यातील गावांमधील रहिवाशांना जाणवणाऱ्या समस्यांचा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी, कंत्राटदार तसेच स्थानिक रहिवाशांसमवेत […]
वाळूची तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून कडक उपाययोजना
मुंबई : वाळूची तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून कडक उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. बुलढाणा जिल्ह्यातील गोळेगाव येथे वाळू माफियांतर्फे वाळू वाहतूक विरोध केल्याने एका व्यक्तीस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विधानसभा सदस्य सुनिल प्रभू, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य बबनराव लोणीकर यांनी प्रश्न उपस्थित […]
ब्रेकिंग! राज्य सरकारला मोठा झटका, परमबीर सिंग प्रकरणाची चौकशी CBI कडे सोपविण्याचे आदेश
नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. गुरुवारी परबीर सिंग प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडताना सांगितले की, कोणत्याही तपासासाठी राज्याची संमती आवश्यक आहे. सीबीआयच्या तपासामुळे पोलिसांच्या मनोबलावर परिणाम होईल, असे सरकारी […]
गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलातील ४१६ रिक्त पदे तातडीने भरणार, गृह विभागाची मंजुरी
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलातील ४१६ रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी गृह विभागाने मंजुरी दिलेली आहे. थेट पोलीस घटक स्तरावरून ही पदे भरण्याचे निर्देश गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. गृह विभागाकडून याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात अनेक पोलीस पदे रिक्त असूनही ती भरण्याची प्रक्रिया सुरू केली जात नव्हती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]









