9 bills were passed in the winter session of the Legislature
महाराष्ट्र मुंबई

वाळूची तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून कडक उपाययोजना

मुंबई : वाळूची तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून कडक उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बुलढाणा जिल्ह्यातील गोळेगाव येथे वाळू माफियांतर्फे वाळू वाहतूक विरोध केल्याने एका व्यक्तीस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विधानसभा सदस्य सुनिल प्रभू, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य बबनराव लोणीकर यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री देसाई म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यातील गोळेगाव मध्ये 11 जानेवारी 2022 रोजी या विषयासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये तीन आरोपी आहेत. त्यांचा पोलिसांनी तपास केला असता ते कुठेच सापडले नाहीत. हे आरोपी फरार असल्यामुळे पोलिसांना त्यांना अटक करता आली नाही.

त्याचदरम्यान आरोपींनी अंतरिम जामीन घेतला आहे. अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी पोलीस विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल. तसेच वाळू तस्करीच्या घटना घडू नयेत यासाठी पोलीस विभागाकडून नेहमीच महसूल विभागाला सहकार्य केले जाते. पोलीस विभाग व महसूल या दोन्ही विभागांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात यासाठी या दोन्ही विभागाची संयुक्त बैठक बोलविण्यात येईल असेही राज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत