मुंबई : शालेय शिक्षण विभागाने राज्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि ११ वीच्या शाळा एप्रिल महिन्यात सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान, आता शिक्षण संचालनालयाने २०२२ ची उन्हाळी सुटी २ मेपासून जाहीर करून नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून सुरू करण्यात याव्यात, अशी विनंती शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
राज्य होणार कोरोनाच्या निर्बंधातून मुक्त, राजेश टोपे यांनी दिली माहिती
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून आता १ एप्रिलपासून कोरोनासंबंधीचे सर्व निर्बंध मागे घेण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे. १ एप्रिलपासून आपत्कालीन कायदा मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. पण असं असलं तरीही मास्क वापरणं हे अनिवार्य आहे. मास्कशिवाय कोणीही बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई होईल अशीही […]
पुण्यातील कात्रज परिसरात सुमारे 20 सिलेंडरचा स्फोट
पुणे : पुण्यातील कात्रज परिसरातील गंधर्व लॉन्स जवळ सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे परिसरात आगीचे लोट पाहायला मिळत आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 20 सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. याठिकाणी असलेल्या एका शेडमधे बेकायदा गॅस रिफिलिंग […]
आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात
रत्नागिरी : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. ते आज रत्नागिरी दौऱ्यावर असून रत्नागिरीतील खारेपाटण याठिकाणी त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. सुमारे 11.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन गाड्यांचं मोठं नुकसान झालं असून आदित्य ठाकरे सुखरूप असल्याची माहिती आहे. कणकवलीतील खारेपाटण चेकपोस्ट येथे […]
आजेसासुचा अंत्यविधी करून घरी आल्यानंतर नातसुनेचाही मृत्यू
नाशिक : नाशिकमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. आजेसासुचा अंत्यविधी करून घरी आल्यानंतर कपडे वाळत घालत असताना विजेचा शॉक लागून नातसुनेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलीस तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या देवळा तालुक्यातील सावकी गावात हा प्रकार घडला. आकांक्षा कचवे यांच्या […]
मित्राच्या लग्नात बेधुंद होऊन नाचताना घडला अनर्थ, तरुणाचा मृत्यू
बीड : मित्राच्या लग्नातील मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वैभव रामभाऊ राऊत (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील शिंदेवाडी गावात रविवारी रात्री ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी शिंदेवाडी गावात विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नात वधू-वर दोघेही शिंदेवाडी गावचे रहिवासी होते. नवरदेव अक्षय […]
पुणे ग्रामीण पोलीस दलाचा ‘स्मार्ट पोलिसींग’ उपक्रम राज्यात राबवा- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : सध्याच्या काळात पोलिसींगची संकल्पना बदलत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेला ‘स्मार्ट पोलिसींग’चा उपक्रम चांगला असून तो अधिक प्रभाविपणे आणि राज्यभरातील पोलीस दलात राबवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात सबसिडीअरी पोलीस कँटीनचे उद्घाटन, नूतनीकृत भीमाशंकर सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन, पोलीस दलाला डायल ११२ उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या […]
राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार, ‘सीएनजी’वरील व्हॅट कपातीची अधिसूचना जारी
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे 1 एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असून याचा फायदा ऑटोरिक्षा, टॅक्सी […]
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘ही’ १७ विधेयके संमत
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांमार्फत दोन्ही सभागृहातील सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न, प्रस्ताव, मागण्यांवर समर्पक चर्चा करण्यात आली. तसेच या अधिवेशनात एकूण 17 विधेयके संमत करण्यात आली असून सर्व विधेयके सविस्तर चर्चा करून शांततेत संमत करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]
विदर्भ, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही
मुंबई : राज्य शासनाने विदर्भ तसेच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी दिला आहे. राज्यपाल यांच्या निर्देशाप्रमाणे पंचसुत्रीनुसार निधीचे वाटप करण्यात येत आहे. विदर्भ, मराठवाड्यावर महाविकास आघाडी शासन कोणताही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षाच्या विधानसभा नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर […]









