मुंबई : महाराष्ट्र सरकार भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करेल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत यांनी म्हटले कि, उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोंग्यांबाबत तोडगा काढला. महाराष्ट्रातही सरकारने असाच तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, भाजपचे नेते या बैठकीला आले नाहीत. त्यांना भोंग्यांच्या […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
किरीट सोमय्या यांची FIR रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव, याचिकेत केलेत ‘हे’ गंभीर आरोप
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे नोंदवलेला प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) रद्द करण्याची मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमय्या यांनी कायदेशीर फर्ममार्फत दाखल केलेल्या त्यांच्या याचिकेत, आरोप केला आहे की त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एफआयआरच्या तपशीलांमध्ये फेरफार केला होता. म्हणून, त्यांनी एफआयआर […]
विविध जिल्ह्यांमध्ये आधुनिक वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. विमा कंपन्यांशी झालेल्या सामंजस्य करारानुसार राज्य आरोग्य हमी सोसायटीस उपलब्ध झालेल्या २७२.७१ कोटी इतक्या निधीतून या वैद्यकीय सोयी सुविधा उभारण्यात येतील. यामध्ये ठाणे, रत्नागिरी, बारामती, जालना येथे रेडिएशन ऑन्कॉलॉजीची युनिट स्थापन करण्यात […]
अनुसूचित जातीतील घटकांना कर्ज मिळण्यातील अडचणी दूर, महामंडळांच्या भागभांडवलात वाढ
मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील महामंडळांकडे असणाऱ्या अपुऱ्या भागभांडवलामुळे अनुसूचित जातीतील घटकांना कर्ज मिळण्यास, स्वयंरोजगार उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झालेल्या होत्या त्या दूर करण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा रु.५०० कोटी वरुन रु.१००० कोटी करण्यात आली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास […]
पुणे : येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास मान्यता
पुणे : पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आयटीआय सुरु करणे व या संस्थेसाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयानुसार या संस्थेसाठी ४० पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये औद्योगिक आस्थापना, औद्योगिक समूह यांची मोठी संख्या आहे. येरवडा व नगररोड या क्षेत्रात […]
देशातील पहिलाच प्रकल्प : महाराष्ट्र जनुक कोष निर्माण करणार
मुंबई : देशातील पहिल्याच अशा महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पातील शिफारशीनुसार राज्यभरात अंमलबजावणी केल्यास राज्यातील जैवविविधतेचे संवर्धन होऊन येणाऱ्या पिढीकरिता नैसर्गिक संसाधने जतन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने सन २०१४-२०१९ पर्यंत राबवविलेल्या […]
मंत्रिमंडळ बैठक : अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी वाहतूक व साखर घट उतारा अनुदान देण्याचा निर्णय
मुंबई : गळीत हंगाम 2021-2022 मधील अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी वाहतूक अनुदान व साखर घट उतारा अनुदान देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयाप्रमाणे 1 मे 2022 पासुन गाळप होणाऱ्या व साखर आयुक्तालयाने अनिवार्य वितरित केलेल्या ऊसासाठी 50 किमी अंतर वगळून वाहतूक खर्च प्रति टन प्रति किमी […]
शेतकऱ्यांना “सौर ऊर्जा कुंपण”उभारण्यासाठी अनुदान, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील संवेदनशील गावांमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून त्यामध्ये सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. वनक्षेत्राचे प्रभावी संरक्षणामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत अलीकडे लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर मानव-वन्यजीव संघर्ष वाढून विशेषत: शेतपीक […]
पुणे : रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीला कारने चिरडले, धक्कादायक घटना कॅमेरात कैद…
पुणे : पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. मार्केट यार्ड परिसरात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका व्यक्तीला एसयूव्हीने चिरडले. या प्रकरणातील सर्वात लाजिरवाणी बाब म्हणजे त्या व्यक्तीला गाडीच्या दोन्ही चाकांनी चिरडल्यानंतर आरोपी न थांबता घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना मार्केट यार्ड परिसरात घडली. या प्रकरणाचा तपास करत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. ए. कांबळे यांनी […]
संभाजी भिडे चक्कर येऊन सायकलवरून पडले, रुग्णालयात उपचार सुरु
सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे सायकलवरून पडल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला मार लागला आहे. भिडे यांच्यावर भारती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संभाजी भिडे सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. यावेळी त्यांना अचानक चक्कर आल्यामुळे ते सायकलवरुन खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. ते आपल्या वक्तव्यांमुळे […]







