मुंबई : संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे नूतनीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार झालेल्या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. आज पाहणी केल्यानंतर या प्रदर्शनाबाबत सर्वसामान्यांना तसेच विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यादृष्टीने येथे लेझर शोच्या माध्यमातून माहिती दिली जावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
नांदेडमध्ये खळबळ! २४ तासात दोन तरुणांची निर्घृण हत्या
नांदेड, 01 मे : नांदेड शहरात गेल्या दोन दिवसात दोन जणांचा खून झाला आहे. दोन दिवसात झालेल्या दोन खुनांच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पहिला खून जुन्या नांदेड शहरात झाला आहे. एका 23 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खुन करण्यात आला आहे. तर दुसरा खून मिलगेट परिसरात संपादकावर तीक्ष्ण चाकूनं वार करून केला आहे. […]
दुःखद! ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन
मुंबई , ०१-मे-२०२२ : ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या 61 वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेमा यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ८०,९० च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, अर्धांगी, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर, अर्जुन देवा, उतावळा […]
राज ठाकरे यांच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांवर धडकल्या
अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. राज ठाकरे यांच्या ताफ्यातील मागील बाजूला असलेल्या तीन गाड्या एकमेकांवर धडकल्याचे समजते. दोन गाड्यांच्या बोनेटचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. नगर-औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव (ता. नेवासा) येथे ही घटना घडली आहे. यात दिग्दर्शक केदार […]
मुलांना शालेय शिक्षणाबरोबर चारित्र्य संपन्न घडवा, उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना
सोलापूर : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देणे कर्तव्य आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नैतिक मूल्यांची वाढ, चारित्र्य संपन्न होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. जिल्हा परिषद शाळा पापरी ता. मोहोळ येथील स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. पवार म्हणाले, शिक्षक हे उद्याची पिढी घडवीत असल्याने अंधश्रद्धेला खतपाणी […]
कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी पुढील शिक्षण घेणार, मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानगी
मुंबई : 2017 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या दोन कैद्यांना मुंबई उच्च न्यायालयाने तुरुंगवासात मुक्त विद्यापीठातून शिक्षण सुरू ठेवण्याची परवानगी दिली. न्यायमूर्ती पी. बी. वराळे आणि एस. एम. मोडक यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना कोठडीत असताना शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दोषींच्या विनंतीला मान्यता देण्याचे आवाहन केले. न्यायालयाने म्हटले कि, “आम्ही पुढे असे […]
सर्वसामान्य जनतेस सन्मानाची वागणूक द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर, दि. 29 : कायदा व सुव्यवस्था कायम ठेवतानाच सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी.असे बजावतानाच पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणासह आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूर येथील सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा असलेल्या पोलीस भवन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. […]
महाराष्ट्र राज्य जीएसटी पथकाची कारवाई, २१८ कोटी रुपयांच्या बनावट बिलांवरून बोगस आयटीसी दाव्याप्रकरणी तिघांना अटक
मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र जीएसटीच्या सर्वसमावेशक विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि जीएसटी पोर्टलवर उपलब्ध माहितीद्वारे नवीन नोंदणीकृत करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करताना विभागाला काही करदात्यांचे 200 कोटींपेक्षा जास्त रकमेचे संशयास्पद व्यावसायिक व्यवहार लक्षात आले. २५ एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र राज्य जीएसटीच्या पथकांद्वारे उल्हासनगर येथे असलेल्या मे. एम्पायर एंटरप्राइजेस, M/S. शंकर एंटरप्रायझेस आणि M/S. M M Enterprises. या […]
मुंबईकरांना मोठा दिलासा! एसी लोकलच्या तिकीट दरात 50 टक्क्यांनी कपात
मुंबई : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. आज भायखळा रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन करण्यात आलं, यावेळी ते बोलत होते. ‘वातानुकूलित रेल्वेच्या तिकीट दरात किती कपात करायला हवी, असं आम्ही वेगवेगळ्या स्तरातील लोकांना विचारत होतो. त्यावर कोणी म्हणत होतं […]
उष्णतेची लाट तीव्र होणार! ‘या’ चार जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी, काळजी घ्या…
मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान हे चाळीसच्या वर गेले असून हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील चार शहरांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र आणि भारताच्या मध्य भागात ५ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. शक्यतो दुपारी घरी किंवा ऑफिसमध्येच राहा आणि अगदी आवश्यक असेल तरच प्रवास करा, असा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे. पुढील […]










