ठाकरे गटाच्या शिवसेनेला लागलेल्या गळतीनंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विनायक राऊत, अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परब आणि इतर काही नेते उपस्थित होते. मात्र, भास्कर जाधव या बैठकीला उपस्थित नसल्यामुळे चर्चा सुरू झाल्या. यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. “भास्कर जाधव हे जेष्ठ नेते आहेत. उगाच तुम्ही इथे […]
मुंबई
राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत, काहीही बरळतात; भाजपच्या बड्या मंत्र्याची जिव्हारी लागणारी टीका
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका करतांना म्हटलं, “फक्त दोन तासांसाठी ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या, अमित शाहसुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील.” ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, ज्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं. यावर संजय […]
‘आरटीई’ प्रवेश सोडतीची निवड यादी आज होणार जाहीर
मुंबई : ‘आरटीई’ २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत (लॉटरी) दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी शालेय शिक्षण आयुक्त यांच्या उपस्थितीत काढण्यात आली होती. त्यानुसार आरटीई २५ टक्के प्रवेशासाठीची निवड यादी दि. १४ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येत असून लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश घेण्यासाठी दि. १४ ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत कालावधी देण्यात येत असल्याची […]
लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही!, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई : “लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे”, असे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगतानाच “ही योजना कधीही बंद पडणार नाही” अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील घरकाम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थेने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र […]
महा हॅकेथॉन चॅलेंज १.० स्पर्धेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : माहिती तंत्रज्ञान विषयक विविध समस्यांवर उपाय सुचविण्यासाठी ‘महा हॅकेथॉन चॅलेंज १.०’ स्पर्धेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या कार्यक्रमात स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माहिती तंत्रज्ञान मंत्री ऍड. आशिष शेलार, मंत्रिमंडळातील अन्य सदस्य गण आदी उपस्थित होते. राज्य शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग आणि […]
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे : पनवेल एक्झिट मार्ग ११ फेब्रुवारीपासून सहा महिने राहणार बंद
पनवेल : पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट रोड ११ फेब्रुवारीपासून सहा महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वापरणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासात मोठा बदल करावा लागेल. कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पांतर्गत कळंबोली सर्कल येथे कन्स्ट्रक्शन कामामुळे हे बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या ठिकाणी नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बांधण्याची […]
बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण भागात सेवा देणे बंधनकारक – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई : निवड मंडळाच्या गुणवत्ता यादीनुसार समुपदेशनाद्वारे भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी. तसेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा देणे बंधनकारक असल्याने या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. आरोग्य सेवा आयुक्तालयात सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध विषयांच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत […]
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
मुंबई : राज्यातील सर्वच शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करावी, अशी सूचना देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. शिवपाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने महसूल मंत्री […]
नवीन कामगार कायदे लागू करताना कामगार हिताची पूर्ण काळजी घेतली जाईल – कामगार मंत्री आकाश फुंडकर
मुंबई : नवीन कामगार कायदे लागू करताना कामगार हिताची काळजी घेण्यात येईल तसेच भारतीय मजदूर संघाने घेतलेल्या हरकतींचा पूर्ण विचार केला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज केले. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने नवीन लेबर कोड आणि बी.एम.एस. या विषयावर आयोजित सेमिनार मध्ये ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय मजदूर […]
अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन
मुंबई : महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडीत पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, अधीक्षक ही पदे भरण्यात येत आहेत. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार असून, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. राज्य शासनाच्या 100 दिवस उद्दिष्टपूर्ती अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील […]










