मुंबई : बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील एकूण ८ शैक्षणिक वर्षातील सुमारे १० लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे जारी करण्यात येत आहेत. यामुळे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना पायबंद घातला जाणार असून उद्योगांना उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करणे सुलभ होणार आहे. शिवाय यामुळे योग्य उमेदवारांचीही होणारी […]
मुंबई
अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा
मुंबई : अंथरुणाला खिळून असणारे (बेड रिडन) रुग्ण, व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा व्यक्तींच्या माहितीची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पथकामार्फत त्यांचे लसीकरण केले जाईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. राज्यात ज्या ठिकाणी घरात अंथरूणाला खिळून असलेले रुग्ण, व्यक्ती आहे आणि ज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करायचे […]
मुंबईतील चेंबूर भागात भिंत कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू, मदत व बचावकार्य सुरू
मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने थैमान घातलं असून चेंबूर भागात भिंत कोसळल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आज रात्री 1 वाजता ही घटना घडली. वाशिनाका येथील न्यू भारत नगरमध्ये ही घटना घडली. एक झाड भिंतीवर पडल्यानंतर भिंत कोसळली. यातील मृतांची संख्या आता १2 वर पोहोचली आहे. तर विक्रोळीतही 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
भाजप नेते अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात
मुंबई : मेट्रोच्या कामासाठी मालाड येथील कुरार परिसरातील घरांवर सकाळी कारवाई करण्यात आली. स्थानिक नागरिकांकडून या कारवाईला विरोध होत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या कारवाईला विरोध केला असून त्यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अतुल भातखळकर यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली. अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटलं कि, “कुरार परिसरातील नागरिकांना शुक्रवारी रात्री […]
मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी, प्रवास टाळण्याचा सल्ला
मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस होत आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं असून अनेक भागांत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. आजही मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना […]
टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
मुंबई : टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमारने आगामी प्रकल्पात नोकरी देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा दावा एका महिलेने केला आहे. याप्रकरणी भूषण कुमार यांच्याविरूद्ध मुंबईच्या डी एन नगर पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूषण कुमार याच्याविरोधात भारतीय दंड संहिताच्या कलम 376 नुसार बलात्काराचा […]
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी उद्या अंतिम मुदत
मुंबई : राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप २०२१ साठी आतापर्यंत 37 लाख 23 हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले असून उद्या दिनांक 15 जुलै ही योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. दरम्यान राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे पेरण्यांना वेग आला असून प्रमुख पिकांच्या पेरणीमध्ये सोयाबीन 99 टक्के तर कापूस पिकाची 81 टक्के […]
कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना राज्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे शुल्क सवलत, ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ
मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. त्यामुळे राज्यातील ३८ शासकीय, १५१ विनाअनुदानित अशा एकूण १८९ महाविद्यालयातील ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्याचे आई-वडील, पालक यांचा कोरोनामुळे […]
दि. १४ जुलै २०२१ : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय
राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे धोरण सर्व प्रकारचे स्पर्धात्मक साहसी खेळ वन्यजीव अभयारण्यातील जीप सफारी व निसर्ग सहली इत्यादींच्या बाबत लागू नसेल. या धोरणानुसार राज्यात साहसी पर्यटन आयोजित करणाऱ्या आयोजकांना पर्यटन संचालनालयाकडून प्रथम तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र व […]
नवी मुंबईत देशातील सर्वात मोठे इव्ही चार्जिंग स्टेशन
मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री देसाई म्हणाले की, दिवसेंदिवस इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्यांना ही दरवाढ परवडत नाही. याला पर्याय म्हणून विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण शासनाने ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विजेवर […]









