मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने थैमान घातलं असून चेंबूर भागात भिंत कोसळल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आज रात्री 1 वाजता ही घटना घडली. वाशिनाका येथील न्यू भारत नगरमध्ये ही घटना घडली. एक झाड भिंतीवर पडल्यानंतर भिंत कोसळली. यातील मृतांची संख्या आता १2 वर पोहोचली आहे. तर विक्रोळीतही 3 लोकांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिंतीचा ढिगारा बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, पावसामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहेत. आतापर्यंत 16 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.
Saddened by the loss of lives due to wall collapses in Chembur and Vikhroli in Mumbai. In this hour of grief, my thoughts are with the bereaved families. Praying that those who are injured have a speedy recovery: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 18, 2021
हवामान खात्याकडून आजदेखील मुंबई व आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच लोकांना समुद्रापासून दूर रहाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात २५३.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.




