पंढरपूर : तालमीत कुस्तीचा सराव करत असताना २३ वर्षाच्या पैलवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूरच्या वाखरी येथील मारूती सुरवसे हा तरुण कोल्हापुरातील एका तालमीत सराव करत होता, त्यावेळी ही घटना घडली. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरवसे हा कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत होता. दरम्यान, रात्री तालमीत कुस्तीचा […]
कोल्हापूर
राधानगरी तालुक्यातील 9 सिंचन योजनांच्या खर्चावरील स्थगिती उठविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील विशेष भौगोलिक परिस्थिती पाहता ९ विविध योजनांच्या कामांसाठी ५८ कोटी रुपये खर्चास दिलेली स्थगिती उठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राधानगरी विधानसभा मतदार संघातील जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत सुमारे […]
कोरोनामुळे विधवा झालेल्या महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे – कृषीमंत्री दादाजी भुसे
कोल्हापूर : कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे, हा स्तुत्य उपक्रम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले. कृषी विभागाची कोल्हापूर व […]
कार दरीमध्ये कोसळून भीषण दुर्घटना, कोल्हापूरातील 2 तरुण जागीच ठार, 2 जखमी
कोल्हापूर : कार २५ फूट खोल दरीमध्ये कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत कोल्हापूरातील दोन तरुण जागीच ठार झाले, तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळल्याचे सांगितले जात आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम हेमंत सोनार (वय २४ रा. राजारामपूरी) आणि शंतनू शिरीष कुलकर्णी (वय […]
टीव्ही अभिनेत्याला विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये अटक
कोल्हापूर : एका टीव्ही अभिनेत्याला विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र शेलाजी पोळ (वय ३२) असे अटक केलेल्या कलाकाराचे नाव आहे. त्याने पोलिसांना सांगितले की ‘गजानन महाराज शेगाव’ या मालिकेत त्याने भूमिका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र पोळ याची शादी डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून एका महिलेशी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर त्यानं संबंधित महिलेशी […]
शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपवले जीवन, शिक्षकाला अटक
कोल्हापूर : शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. कोल्हापूर, मुरगूड पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे. कागल तालुक्यातील अर्जुनवाडा येथे ही घटना घडली. आकांक्षा तानाजी सातवेकर (वय 19) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमित भीमराव कुंभार या शिक्षकाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनवाडा येथील रहिवाशी असलेला […]
दुःखद! ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन डी पाटील यांचं निधन
कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांसाठी नेहमीच पुढे येऊन संघर्ष करणारे नेते प्रा. एन. डी .पाटील यांचे वृद्धापकळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन डी पाटील यांच्या निधनामुळं सर्वच स्तरातून दुःख व्यक्त केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एन. डी. पाटील […]
दिलासादायक! राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश
कोल्हापूर : राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात जलसंपदा विभागाला यश आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोल्हापूर) रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे. आज सकाळी साडे नऊ च्या दरम्यान राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना अपघाताने सर्व्हिस गेट उघडले होते. यामुळे नदीपात्राची पाणी पातळी वाढत होती. नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा […]
कोल्हापुरातील राधानगरी धरणातून होणारा विसर्ग संध्याकाळपर्यंत होईल बंद, नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता
कोल्हापूर : आज सकाळी साडेनऊ वाजता राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे तांत्रिक काम सुरु असताना अचानक अपघाताने सर्विस गेट ओपन झाले आहे. यामुळे नदीपात्रात सुमारे 4 ते 5 फुटांनी पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल, जलसंपदा व संबंधित विभागांच्या वतीने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. पब्लिक ऍड्रेस सिस्टीम (पीएएस) द्वारेही […]
चिंताजनक! धरणाचा दरवाजा बंद होत नसल्यामुळे कोल्हापुरात महापूराची भीती
कोल्हापूर : राधानगरी धरणाचा दरवाजा अडकल्याने बंद होत नसल्यामुळे कोल्हापुरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. तांत्रिक कामासाठी उघडण्यात आलेला हा दरवाजा जवळपास १८ फुटाने उघडला गेला आहे. त्यामुळं पंचगंगा, भोगावती नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जलसंपदा विभागातील तांत्रिक विभागातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने राधानगरी […]









