कोल्हापूर महाराष्ट्र

शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपवले जीवन, शिक्षकाला अटक

कोल्हापूर : शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. कोल्हापूर, मुरगूड पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे. कागल तालुक्यातील अर्जुनवाडा येथे ही घटना घडली. आकांक्षा तानाजी सातवेकर (वय 19) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमित भीमराव कुंभार या शिक्षकाला अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनवाडा येथील रहिवाशी असलेला आणि सध्या मुगळी येथील एका शाळेमध्ये शिक्षक असलेला अमित कुंभार हा महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या आकांक्षाला सतत फोन करत असे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याकडे लग्न करण्याचा तगादा लावला होता. तो मागील दीड महिन्यापासून तिला त्रास देत होता. तु लग्नासाठी होकार दिलास तर, मी माझी बायको मुलांना सोडून तुझ्या बरोबर लग्न करण्यास तयार होईन, असे अनेक मेसेजेसही तो पाठवत होता.

शेवटी या सर्व त्रासाला कंटाळून आकांक्षाने 22 जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरीच विष प्राशन केले. तिला तात्काळ उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. 27 जानेवारी रोजी आकांक्षाने वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या समोर जबाब दिला होता की मी अमित कुंभार यांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केले. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, काल दुपारी तिचे निधन झाले. याप्रकरणी कोल्हापूर, मुरगूड पोलिसांनी अमित भीमराव कुंभार या शिक्षकाला आज अटक केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत