जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते नाशिकमधील सिडको परिसरात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे कोविड रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रभू रामचंद्र कोणाच्या सातबारावर नाहीत. तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं आणि भक्ती करणं वेगळं. ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, ज्याच्या मनात आई-वडिलांबद्दल आत्मीयता आहे, ज्याच्यात मर्यादा आहेत, त्याच्यात कुठेतरी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन
माजी सपा नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. उत्तर प्रदेशातल्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. जुलै २०१६ मध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले. अमर सिंह हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले होते. समाजवादी पक्षापासून वेगळे झाल्यानंतर […]
मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय
करोनाच्या लढ्यातील अत्यावश्यक भाग बनलेल्या मास्क व सॅनिटाइजरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यासाठी आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती लवकरच मास्कचे व हॅण्ड सॅनिटाइजरचे दर किती असेल हे निश्चित करणार आहे. करोनाच्या काळात रुग्णांची गरज व असहाय्य्यता लक्षात घेऊन विविध आरोग्य विषयक उत्पादकांनी भाव वाढवून वारेमाप […]
सुशांत आत्महत्येचा विचारही करू शकत नाही- अंकिता लोखंडे
सुशांत काम भेटलं नाही म्हणून कधीच तणावात जाणार नाही,न्यूज 18 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने तिचे मत व्यक्त केले. या काळातही भरपूर चित्रपटात कामाच्या संधी त्याला मिळतच होत्या. उलट सुशांत अनेक चित्रपट नाकारत असे. त्याला बौद्धिक कुवत चांगली असलेल्या लोकांशी बोलायला आवडत असे. सुशांत सर्वांशी भरभरून बोलायचा. सगळेजण म्हणत आहेत त्याला डिप्रेशनचा आजार होता. मात्र मला […]
राज्यमंत्री भरणे यांनी अपघातग्रस्ताला स्वतःची गाडी देत रुग्णालयात पोहोचवले
काल संध्याकाळी शुक्रवार (31 जुलै) रोजी इंदापूर तालुक्यातील जंक्शन या गावाजवळ बारामती-इंदापूर राज्यमार्गावर दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये बारामती तालुक्यातील सोनगांवचे रहिवासी विश्वनाथ सिताराम गोफणे हे जखमी झाले होते. तेथे बघ्यांची गर्दी झाली होती, मात्र कोणीही मदतीसाठी येत नव्हते. जखमीच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव सुरु होता. ते रस्त्यावरच बेशुद्ध अवस्थेत पडले होते. […]
दूध दरवाढीसाठी राज्यात स्वाभिमानीचं आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दर वाढीसाठी व प्रतिलिटर अनुदान देण्याची मागणी करत राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूधपावडर आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे या आंदोलनाला प्रतिसाद देण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या […]
हार्दिकने पोस्ट केला आपला बाळा बरोबरचा फोटो
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविच यांना ३० जुलै रोजी मुलगा झाला. हार्दिकने स्वत: ट्विट करून याबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर हार्दिकने बाळाच्या हातात आपला हात असल्याचा फोटो पोस्ट करत साऱ्यांनी ही गोड बातमी सांगितली. हार्दिकनं ही आनंदाची बातमी दिल्यानंतर बीसीसीआयनंदेखील त्याचं अभिनंदन केलं होतं. तसंच सर्व खेळाडू आणि हार्दिकच्या चाहत्यांनीही दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव […]
कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे. स्टेअरिंग कुणाच्या हाती? पुढे कोण बसलं आहे मागे कोण बसलं आहे हे महत्त्वाचं नाही. आम्ही सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. सर्वजण मिळून काम करत आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. सुशांत सिंह राजपूत […]
कोरोना प्रसार वाढण्यास केंद्र सरकारने जाहीर केलेलं पहिलं लॉकडाऊन जबाबदार- जयंत पाटील
देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या परिस्थितीला केंद्र सरकारने जाहीर केलेलं पहिलं लॉकडाऊन जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारने पहिला लॉकडाऊन लागू करताना कुणालाही विश्वासात घेतलं नाही. पहिला लॉकडाऊन लागू करण्याआधी […]
सरकार जरी तीन पक्षाचे असले तरी ड्रायव्हिंग सीटवर मुख्यमंत्रीच- अशोक चव्हाण
सध्या राज्यात तीन पक्षांच सरकार असलं तरी राज्य सरकारचं स्टेअरिंग हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचं सार्वजनिक बांधाकम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. महाविकास सरकार पुढील पाच वर्षे टिकेल असा विश्वास देखील चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केला. अशोक चव्हाण म्हणाले, सरकार […]










