पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी मन की बात कार्यक्रमातून संवाद साधला.यात त्यांनी कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याचं स्मरण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, यावेळी १५ ऑगस्टही वेगळ्या परिस्थिती साजरा होईल. माझं देशवासीयांना आवाहन आहे की, आपण स्वातंत्र्य दिनाला शपथ घ्यावी की, महामारीपासून स्वतंत्र होऊ. आत्मनिर्भर भारताचा, काही नवीन शिकण्याचा, शिकवण्याचा संकल्प करावा. आपल्या कर्तव्यांचं पालन करण्याचा […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. २०२०- २१ हे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन, टीव्ही आणि इतर माध्यमातून सुरु झालं आहे. अशा परिस्थितीत मुलांना दडपण येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे. कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य […]
पुण्यात 24 जुलैपासून लॉकडाउन नसलं तरीही निर्बंंध मात्र कायम
पुण्यात 24 जुलैपासून लॉकडाउन नसलं तरीही निर्बंंध मात्र कायम ठेवण्यात आले आहेत, असं पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केलं. 65 वर्षे वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुलं यांना अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य विषयक अडचणींशिवाय बाहेर जाता येणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा, किराणा, भाजीपाला विक्री, […]
औरंगाबाद मध्ये मुसळधार पाऊस
औरंगाबाद मध्ये मुसळधार पाऊस झाला असून सखल भागातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ आज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर आज हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे.
पुणे शहरात पुढील आठवडाभर पावसाची शक्यता
पुणे शहरात पुढील आठवडाभर पावसाची शक्यता असून, जिल्ह्यांतील घाटक्षेत्रांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट करून जाहीर केलं
१) बालवाडी – सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग होणार आहे. याचा कालावधी प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचा असणार आहे. पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केलं जाईल . २)पहिली व दुसरी – सोमवार ते शुक्रवार या कालावधीत प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचे दोन वर्ग घेण्यात येणार आहे व १५ मिनिटं विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असणार आहे. तर […]
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
राज्यातील वैद्यकीय परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र कोविड-19 च्या प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण झाल्यास घेण्यात याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिलेल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही- भाजपा खासदार उदयनराजे भोसले
शपथविधीदरम्यान ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज दिली. उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना सांगितलं, व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही. काँग्रेसच्या एका खासदाराने आक्षेप घेतला असता त्यांनी फक्त समज दिली. त्यांनी रेकॉर्डवर फक्त शपथ घेतली जाईल आणि हे राज्यघटनेला धरुन नाही इतकंच सांगितलं. शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण केलं जाऊ […]









