मनोरंजन

‘दिल बेचारा’मुळे अनुपम खेर यांच्या डोळ्यांत अश्रू

अभिनेते अनुपम खेर यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘दिल बेचारा’ चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. “प्रिय सुशांत सिंह राजपुत, दिल बेचारा हा चित्रपट प्रदर्शित झाला. भौतिक जगात तू आमच्यासोबत नाहीस याचं कायम दु:ख राहिल. तुझा हा चित्रपट आम्ही मनापासून पाहू. हा चित्रपट पाहून आमच्या डोळ्यांतून अश्रू वाहतील. आम्हाला तुझी कायम आठवण येईल.” अशा आशयाचं ट्विट करुन अनुपम […]

क्रीडा

ENG vs WI : वेस्ट इंडिजविरूद्ध अँडरसनचा विक्रम

मँचेस्टर कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध यजमान इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. पहिला डाव ३६९ धावांवर संपल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी १३७ धावांत वेस्ट इंडिजचे ६ गडी माघारी पाठवले. पण अंधुक प्रकाशामुळे दिवसाचा खेळ अर्धा तास लवकर थांबवावा लागला. वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने सहापैकी २ बळी टिपले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने एक विक्रम केला. तसेच […]

महाराष्ट्र राजकारण

फक्त तुमचा उद्योगमंत्री असून चालत नाही, तुमचं सरकारही महत्वाची भूमिका बजावतं-उद्धव ठाकरे

“मागील सरकारमध्ये शिवसेनेचे उद्योगमंत्री असताना करार करूनही  गुंतवणूक आली नाही याचं कारण असं की नुसता तुमचा उद्योगमंत्री असून चालत नाही. तुमचं सरकारही महत्वाची भूमिका बजावतं. धोरणांची अनिश्चितता असेल तर उद्योग येणार नाहीत,” असं उद्धव यांनी सांगितलं. “गुंतवणूक येणार की नाही हे त्या त्या सरकारच्या धोरणावर अवलंबून असतं. नुसती उत्सवप्रियता असेल तर काहीही होणार नाही,” असं […]

देश

पंतप्रधान मोदी यांचं भारतीयांना आवाहन; आपण स्वातंत्र्य दिनाला शपथ घ्यावी की, महामारीपासून स्वतंत्र होऊ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी मन की बात कार्यक्रमातून संवाद साधला.यात त्यांनी कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याचं स्मरण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, यावेळी १५ ऑगस्टही वेगळ्या परिस्थिती साजरा होईल. माझं देशवासीयांना आवाहन आहे की, आपण स्वातंत्र्य दिनाला शपथ घ्यावी की, महामारीपासून स्वतंत्र होऊ. आत्मनिर्भर भारताचा, काही नवीन शिकण्याचा, शिकवण्याचा संकल्प करावा. आपल्या कर्तव्यांचं पालन करण्याचा […]

महाराष्ट्र शैक्षणिक

पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. २०२०- २१ हे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन, टीव्ही आणि इतर माध्यमातून सुरु झालं आहे. अशा परिस्थितीत मुलांना दडपण येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे. कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य […]

कोरोना महाराष्ट्र

पुण्यात 24 जुलैपासून लॉकडाउन नसलं तरीही निर्बंंध मात्र कायम

पुण्यात 24 जुलैपासून लॉकडाउन नसलं तरीही निर्बंंध मात्र कायम ठेवण्यात आले आहेत, असं पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केलं.  65 वर्षे वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुलं यांना अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य विषयक अडचणींशिवाय बाहेर जाता येणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा, किराणा, भाजीपाला विक्री, […]

महाराष्ट्र

औरंगाबाद मध्ये मुसळधार पाऊस

औरंगाबाद मध्ये मुसळधार पाऊस झाला असून सखल भागातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मनोरंजन

सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ आज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर आज हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे.

महाराष्ट्र

पुणे शहरात पुढील आठवडाभर पावसाची शक्यता

पुणे शहरात पुढील आठवडाभर पावसाची शक्यता असून, जिल्ह्यांतील घाटक्षेत्रांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शैक्षणिक

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट करून जाहीर केलं

१) बालवाडी – सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग होणार आहे. याचा कालावधी प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचा असणार आहे. पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केलं जाईल . २)पहिली व दुसरी – सोमवार ते शुक्रवार या कालावधीत प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचे दोन वर्ग घेण्यात येणार आहे व १५ मिनिटं विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असणार आहे. तर […]