पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी मन की बात कार्यक्रमातून संवाद साधला.यात त्यांनी कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याचं स्मरण केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, यावेळी १५ ऑगस्टही वेगळ्या परिस्थिती साजरा होईल. माझं देशवासीयांना आवाहन आहे की, आपण स्वातंत्र्य दिनाला शपथ घ्यावी की, महामारीपासून स्वतंत्र होऊ. आत्मनिर्भर भारताचा, काही नवीन शिकण्याचा, शिकवण्याचा संकल्प करावा. आपल्या कर्तव्यांचं पालन करण्याचा संकल्प करा. आपला देश आज ज्या उंचीवर आहे, तो अनेक महान नेत्यांच्या तपश्चर्येमुळे आहे. ज्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी आपलं जीवन समर्पित केलं. त्यांच्यापैकी एक आहेत लोकमान्य टिळक, यांची १ ऑगस्टला शंभरावी पुण्यतिथी आहे. यांचं जीवन आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी असून आपल्याला खूप काही शिकवते,” असं मोदी म्हणाले.




