इतर

राज्यमंत्री भरणे यांनी अपघातग्रस्ताला स्वतःची गाडी देत रुग्णालयात पोहोचवले

काल संध्याकाळी शुक्रवार (31 जुलै) रोजी इंदापूर तालुक्यातील जंक्शन या गावाजवळ बारामती-इंदापूर राज्यमार्गावर दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये बारामती तालुक्यातील सोनगांवचे रहिवासी विश्वनाथ सिताराम गोफणे हे जखमी झाले होते. तेथे बघ्यांची गर्दी झाली होती, मात्र कोणीही मदतीसाठी येत नव्हते. जखमीच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव सुरु होता. ते रस्त्यावरच बेशुद्ध अवस्थेत पडले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

याच वेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे पुण्याहून आपल्या घरी चालले होते. रस्त्यालगतची गर्दी पाहून भरणे यांनी आपली गाडी थांबवून गर्दी का झाली हे विचारलं. त्यानंतर या ठिकाणी अपघात झाला असून जखमी बेशुद्धावस्थेत पडलेला आहे, असे त्यांना समजले. भरणे यांनी तात्काळ गाडीतून उतरुन या अपघाताची संपूर्ण माहिती घेत, अपघातग्रस्ताला आपल्या स्वतःच्या गाडीत हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. त्यानंतर भरणे तिथल्या एका दुचाकीवरुन घरी गेले.

घरी गेल्यानंतर भरणे यांनी जखमीच्या परिस्थितीची डॉक्टरांकडून माहिती घेतली. सध्या त्याची प्रकृती व्यवस्थित आहे. भरणे यांनी तात्काळ अपघातग्रस्ताला आपली स्वतःची गाडी दिल्याने त्याचा जीव वाचला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत