काल संध्याकाळी शुक्रवार (31 जुलै) रोजी इंदापूर तालुक्यातील जंक्शन या गावाजवळ बारामती-इंदापूर राज्यमार्गावर दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये बारामती तालुक्यातील सोनगांवचे रहिवासी विश्वनाथ सिताराम गोफणे हे जखमी झाले होते. तेथे बघ्यांची गर्दी झाली होती, मात्र कोणीही मदतीसाठी येत नव्हते. जखमीच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव सुरु होता. ते रस्त्यावरच बेशुद्ध अवस्थेत पडले होते. […]

