नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज महाराष्ट्रात 374 कि.मी. लांबीच्या सहा पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर- अक्कलकोट मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 19,142 कोटी रुपये आहे. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर या महत्त्वाच्या शहरांसह पुढे […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
राज्यभर १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’
मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभर 1 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना हे अभियान साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण राज्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत परिवहन विभाग, वाहतूक पोलीस […]
दिव्यांगांच्या विशेष शाळांतील अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सर्वसमावेशक कार्यपद्धती
मुंबई : राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व कार्यशाळांमधील नोंदणी प्रमाणपत्र रद्द होणे, नूतनीकरण न करणे तसेच पटनिर्धारणानंतर विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सर्वसमावेशक व एकसंध कार्यपद्धती निश्चित केली आहे, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली. सचिव मुंढे म्हणाले, यापूर्वी विविध शासन निर्णय, परिपत्रके व शाळा […]
जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री नितेश राणे
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. याविषयी मंत्रालयात आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मित्राचे सल्लागार परशराम पाटील यांच्यासह जेएसडब्ल्यू ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित […]
मुंबईत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
मुंबई : भांडुप (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून किमान १० जण जखमी झाले आहेत. २९ डिसेंबर रोजी रात्री सुमारे १०.०५ वाजता ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे मुंबईतील गर्दीच्या उपनगरीय स्थानक परिसरातील रस्ते सुरक्षा आणि पादचाऱ्यांसाठी अपुऱ्या जागेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा अपघात मार्ग A-606 […]
चंद्रपूरच्या ताडोबा बफर झोनमध्ये वाघाच्या हल्ल्यात दोन कामगारांचा मृत्यू
चंद्रपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) बफर झोनमध्ये वाघांच्या हल्ल्यात दोन बांबू तोडणाऱ्या मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील शैसावी गावाचे रहिवासी बुधसिंग श्यामलाल मडावी (वय ४१) यांचा चंद्रपूर वन परिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ३८१ मध्ये वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. […]
अंघोळ किती वेळ करावी? वैज्ञानिक कारणांसह जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी…
पुणे : दैनंदिन जीवनात अंघोळ ही स्वच्छतेसाठी आवश्यक सवय आहे. मात्र, अंघोळ किती वेळ करावी याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. काही जण दीर्घकाळ अंघोळ करतात, तर काही फारच कमी वेळात आंघोळ उरकतात. वैद्यकीय व त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, अंघोळीचा आदर्श कालावधी 5 ते 10 मिनिटे असावा. वैज्ञानिक कारणे काय सांगतात? त्वचेतील नैसर्गिक तेलांचे संरक्षण त्वचेवर ‘सीबम’ नावाचे नैसर्गिक […]
डोळ्यांसमोर तारे चमकण्यामागे काय कारण असते? जाणून घ्या…
पुणे : अनेक लोकांना कधी कधी अचानक डोळ्यांपुढे तारे चमकताना किंवा झळकणारी लाइट दिसण्याचा अनुभव येतो. ही स्थिती बऱ्याच वेळा नैसर्गिक असली तरी, काही वेळा गंभीर आजारांचेही लक्षण असू शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डोळ्यांपुढे तारे चमकणे (Flashes of light) अनेक कारणांमुळे होऊ शकते. यामध्ये मुख्य कारण म्हणजे डोळ्यातील झिल्ली (Retina) हलकेसे ताणत जाणे किंवा डोळ्याच्या आतल्या […]
लातूरमध्ये हार्वेस्टर मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, धोकादायक यंत्रे वापरताना घ्या आवश्यक काळजी
लातूर : औसा तालुक्यातील आशिव येथे ऊसतोडीसाठी वापरण्यात येणाऱ्या हार्वेस्टर मशीनमध्ये अडकून शंकर प्रभाकर सावंत (वय ४०) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाजूला पडलेला ऊस मशीनमध्ये टाकताना त्यांचा तोल जाऊन ते मशीनमध्ये अडकले. सहकाऱ्यांनी मशीन बंद केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू […]
हृदयद्रावक! अज्ञात प्राण्याने आईच्या कुशीतून ८ महिन्यांच्या चिमुकलीला उचललं, छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह
नागपूर : नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नरसाळा गावाच्या मागील भागात मंगळवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. स्मशानभूमीजवळील नाल्याच्या पलीकडे असलेल्या मजूर वस्तीमध्ये अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात अवघ्या ८ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थलांतरित मजूर कुटुंबांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मृत चिमुकलीचे नाव अनुष्का रवी मेळा […]










