नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार बूटा सिंह यांचे आज सकाळी निधन झाले. 86 वर्षीय बुटा सिंग खूप काळापासून आजाराने ग्रासलेले होते. पंजाबच्या जालंधरमधील मुस्तफापूर गावात जन्मलेल्या बूटा सिंग 8 वेळा लोकसभेचे खासदार होते. त्यांची ओळख पंजाबमधील प्रमुख दलित नेता म्हणून झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी, राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना – बाळासाहेब थोरात
मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलमडली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा चांगला फायदा झाला असून बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करणाऱ्यांनाही मोठा लाभ झाला आहे, असे महसूलमंत्री […]
गॅस गिझरचा स्फोट झाल्याने एकाचा गुदमरून मृत्यू, तुम्हीही वापरताय? घ्या हि काळजी..
नाशिक : गॅस गिझर फुटल्याने गौरव पाटील युवकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धाक्कादायक घटना नाशिक शहरातील सिडको परिसरात घडली. गौरव शुक्रवारी दुपारी अंघोळ करत असताना हा प्रकार घडला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गौरव पाटील त्याच्या घरात बाथरुममध्ये अंघोळ करत होता. यावेळी अचानक गॅस गिझरचा स्फोट झाला. त्यानंतर गौरवला गुदमरायला लागले. […]
पुणे शहरातील पाण्याची अडचण दूर होणार, भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण
पुणे : राज्याचा सर्वांगीण विकास होत असताना वाढते नागरिकरण विचारात घेत पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले. भामा आसखेड प्रकल्पामुळे पुणे शहरातील पाण्याची अडचण दूर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे महानगरपालिका सभागृहात भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस […]
मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स समुहावर मोठी कारवाई
मुंबई : सेबीने उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स समुहाला दंड भरण्याचा आदेश दिला. नोव्हेंबर २००७ मध्ये आढळलेल्या शेअर घोटाळा प्रकरणी सेबीने (Securities and Exchange Board of India – SEBI) ही कारवाई केली. शेअर घोटाळा केल्याप्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीजला २५ कोटी रुपयांचा तर मुकेश अंबानी यांना १५ कोटी रुपयांचा दंड केला. तसेच नवी मुंबई सेझ प्रायव्हेट […]
ब्रेकिंग : कोविशिल्ड कोरोना लसीला मिळाली आपत्कालीन वापरासाठी भारतात मंजूरी
वर्षाच्या सुरुवातीलाच एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना व्हायरसवर विकसित करण्यात आलेल्या लसीला भारत सरकारने मान्यता दिली आहे. सर्च एक्सपर्ट कमेटीने ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन उपयोगासाठी मान्यता दिली आहे. कोरोनाची देशातील पहिली लस कोणती असेल, यावर तज्ज्ञांच्या पॅनेलने आपल्या शिफारसी केंद्र सरकारला सादर केल्या. सीरम इन्स्टिट्यूटचे प्रेझेंटेशन झाले आहे. ज्यासह […]
रोहित शर्मा उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये असेल भारतीय संघाचा उपकर्णधार
हिटमॅन रोहित शर्मा क्वारंटाईन पिरियड संपवून नुकताच भारतीय संघातील खेळाडूंमध्ये सहभागी झाली आहे. तसेच त्याने शुक्रवारपासून तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सराव सुरु केला आहे. निवड समितीने तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने खेळवण्यात आले असून दोन्ही संघांनी त्यापैकी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. उर्वरित दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये […]
पुण्यात तरुणीचा पाठलाग करत अपहरण करून बलात्कार
पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीचा पाठलाग करून तिला टिंगरेनगर येथे रस्त्यात अडविले. त्यानंतर जबरदस्तीने दुचाकीवरून खराडी परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना गुरूवारी पहाटे तीन ते चार वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय पीडित तरुणी खराडी परिसरातील एका […]
गोड बातमी : भारतीय क्रिकेटपटूच्या घरी मुलीचे आगमन, फोटो शेयर करत दिली माहिती
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यात हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेने संघाला दमदार विजय मिळवून दिला. त्यानंतर आता एक गोड बातमी आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याला मुलगी झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे. ट्विट करत त्याने ही आनंदाची बातमी सांगितली. […]
बेंचवर बसण्याच्या वादातून दहावीच्या विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला घातल्या गोळ्या
उत्तर प्रदेश : गुरूवारी बुलंदशहरच्या शिकारपूर भागातील इंटर कॉलेजमध्ये दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्याने भरवर्गात दुसऱ्या विद्यार्थ्याला गोळ्या घालून ठार केलं. आरोपी विद्यार्थ्याने आपल्या लष्करात असणाऱ्या काकांच्या परवानाधारक पिस्तुलाने हल्ला केला. आरोपीने शाळेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु शिक्षकांनी त्याला पकडले. घटनेच्या एक दिवसअगोदर पण बेंचवर बसण्याबाबत दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यानंतर शालेय […]










