राज्यातील रखडलेल्या नोकरभरतीला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील 8500 आणि पोलीस विभागातील 5297 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. परंतु राज्य सरकार महापोर्टलऐवजी चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया करणार आहे. महापोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या नोकर भरतीला अनेकांनी विरोध केला होता. त्यामुळे राज्य सरकारने महापोर्टल रद्द करुन चार कंपन्यांची निवड केली आहे. निवडण्यात आलेल्या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
आता सामान्य नागरिकांना येरवडा जेलमध्ये जाता येणार – गृहमंत्री अनिल देशमुख
26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात ‘जेल पर्यटन’ सुरु करत आहोत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना इथे घडल्या आहेत. भारतात पहिल्यांदाच जेल पर्यटन हा उपक्रम सुरु केला जात आहे, असं गृहमंत्री देशमुख म्हणाले. विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि सामान्य नागरिकांना जेलमध्ये जाऊन ऐतिहासिक घटनांची माहिती […]
पोलीस भरती प्रक्रिया सुरु, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती
राज्यातील रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी पोलीस भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा नसल्याचे स्पष्ट केले. मराठा आरक्षणामुळे पोलीस भरती प्रक्रियेला थोडा विलंब झाला. मात्र, आम्ही मराठा नेत्यांशी बोललो आहोत. राज्यात […]
राज्यातील बर्ड फ्लू नुकसानग्रस्तांना भरपाई देणार – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार
मुंबई : राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून विविध टप्प्यांतील पक्ष्यांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिली. पशुसंवर्धनमंत्री केदार म्हणाले, बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या १ किमी परिघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा […]
राज्याच्या आरोग्य विभागाच्या 8500 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने मेगाभरती जाहीर करत 8500 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी आहे. यासाठी पुढच्या महिन्यात 28 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या पदभरतीचा तपशील आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. या परीक्षेसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये महापोर्टलच्या माध्यमातून अर्ज […]
ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसोनारो यांनी हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत मानले भारताचे आभार
जगभरात कोरोनाचे रुग्ण अजूनही आढळून येत आहेत. कोरोना प्रसार रोखण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. भारतातही आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना परवानगी देण्यात आली असून, लसीकरण सुरू आहे. दरम्यान, भारताने लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं मदत मागितली होती. भारताने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं लसीची मागणी केली होती. […]
अजब : फेसबुकवर सासू-सासऱ्यांच्या विचित्र कमेंट्सला कंटाळून सुनेने त्यांना केलं अनफ्रेंड, तुटलं नातं
एका महिलेने एक पोर्टलवर आपले सासू-सासरे नाराज झाल्याचे कारण सांगितले आहे. हे कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या महिलेने लिहिले आहे कि, माझे सासू-सासरे खूप चांगले आहेत, परंतु सोशल मीडियावरील त्यांचा माझ्याबद्दल दृष्टीकोन खूप विचित्र होता. महिलेने लिहिले की, ‘माझे सासू-सासरे फेसबुकवर माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये होते आणि ते माझ्या प्रत्येक पोस्टवर कमेंट करत असायचे. मी माझ्या […]
100, 10, 5 च्या जुन्या नोटा चलनातून होणार बाद, RBI ने दिली माहिती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार 100, 10, 5 च्या सर्व जुन्या नोटा मार्च-एप्रिलनंतर चलनात नसणार आहेत. या जुन्या नोटा मागे घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. मार्च किंवा एप्रिलपर्यंत आरबीआय १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी सांगितलं […]
पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून होणार सुरू
पुणे : पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीत झालेल्या चर्चेनुसार याबाबत उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून […]
सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीत एक हजार कोटींचं नुकसान – आदर पुनावाला
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सीरमच्या आग लागलेल्या नव्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी या आगीत एक हजार कोटींचं नुकसान झालं आहे, अशी माहिती दिली. इमारतीतील साहित्य जळून खाक झालं आहे. बीसीजी लस आणि रोटाव्हायरस यावरील लसींचंही मोठं नुकसान झालं आहे, असं त्यांनी स्पष्ट […]










