पुणे : राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत सण-उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे लागतील. यंदाचा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करत असतानाच सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे शिवजयंती उत्सव आढावा बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गेल्यावर्षी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
निसर्गसुंदर मेळघाटचा विकास होण्याच्या भूमिकेतून कामे करावित, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश
अमरावती : मेळघाट परिक्षेत्रातील धारणी व चिखलदरा तालुक्यांना निसर्गाने भरभरून सौंदर्य देणगी दिली आहे. या ठिकाणी पर्यटन व जैवविविधतेला भरपूर वाव आहे. मेळघाटातील धारणी, चिखलदरा तालुक्यातील गडगा, तापी, स्काय वाक यासारखे मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी व धोरणात्मक निर्णयासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येणार आहे. मेळघाटच्या निसर्गसौंदर्याच्या आनंद घेण्यासाठी पर्यटनाला चालना द्यावी व रोजगारही निर्माण करावा. […]
दुःखद : ‘चलो बुलावा आया है’ फेम प्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन
प्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल यांचे आज (शुक्रवारी) दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून ते गंभीर आजारी होते आणि दिल्लीच्या सरिता विहारमधील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालय प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 12.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 27 नोव्हेंबरपासून गायक नरेंद्र चंचल यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालय […]
ब्रेकिंग : शिवसेना गटनेत्याच्या नाशिक महापालिकेमधील कार्यालयाला आग
नाशिक : नाशिक महापालिकेमधील शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग लागली आहे. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या भागात सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत.
‘या’ समस्या असतील तर कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस घेऊ नका, सीरम आणि भारत बायोटेकने दिली माहिती
कोविशील्ड लस (Covishield vaccine) आणि कोवॅक्सिन (Covaxin) यांनी जारी केलेल्या फॅक्टशीटमध्ये कोणत्या लोकांना ही लस घेऊ नये, याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. कोवॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकने गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिला तसेच तीव्र ताप, रक्तस्त्राव विकार असलेल्या व्यक्तींना फॅक्टशीटमध्ये ही लस न घेण्याचा सल्ला दिला आहे. तर कोविशील्डची निर्मिती करणार्या सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या फॅक्टशीटमध्ये अशा […]
मोठी बातमी : धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, बलात्काराची तक्रार मागे
मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावरील […]
दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
राज्य शिक्षण मंडळाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केली आहे. १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान तर दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे. बारावीच्या परीक्षांचा निकाल हा जुलै महिना संपण्याआधी लावण्याचा मंडळाचा प्रयत्न असून […]
राज्यातील जलसंधारण कामांच्या विशेष दुरुस्तीसाठी १६८ कोटींची मंजूरी
राज्यातील जलसंधारण विभागाच्या अखत्यारितील ८६२ प्रकल्पांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी १६८ कोटींचा निधी खर्च करण्यासाठी मंजूरी देण्यात आली असल्याने प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढून पूर्ण संकल्पित क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले. दुरुस्ती कामांचे GEOTAG व व्हिडीओ चित्रीकरण गडाख म्हणाले, कामाची गुणवत्ता उत्तम दर्जाची राहील याची जबाबदारी जलसंधारण अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात […]
सीरमच्या आगीत 5 जणांचा मृत्यू, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती
पुणे : सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. जवळपास साडेतीन तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र या अग्नितांडवात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली. दुसरीकडे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मांजरी एसईझेड प्लँटमध्ये आग लागली. […]
‘सिरम’मधील आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने आपत्कालीन उपाययोजना राबवा – मुख्यमंत्री
मुंबई : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ दखल घेऊन पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत व अनुषंगिक आपत्कालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात, असे निर्देश दिले. […]










